Categories: बातम्या

लावा ने लॉन्च केला कमी किंमतीत असलेला बेजल लेस 4जी फोन झेड61, बघा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

लावा ने गेल्या वर्षी इंडिया मध्ये आपल्या झेड स्मार्टफोन सीरीज अंतर्गत झेड60 स्मार्टफोन सादर केला होता. कंपनी ने हा फोन एक सेल्फी सेंट्रिक स्मार्टफोन म्हणून सादर केला होता. आज लावा ने भारतात आपली स्मार्टफोन सीरीज पुढे नेत झेड61 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. लावा ने हा स्मार्टफोन 5,750 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे जो आॅनलाईन शॉपिंग साइट्स सोबतच आॅफलाईन मार्केट मध्ये पण सेल साठी उपलब्ध होईल.

लावा झेड61 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता या फोन मध्ये 18:9 पिक्सल रेज्ल्यूश वाला बेजल लेस डिस्प्ले आहे. फोन 5.45-इंचाच्या एचडी+ आईपीएस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन ची स्क्रीन डॅमेज व स्क्रॅच पासून वाचावी म्हणून 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्ट करण्यात आली आहे. लावा चा हा फोन एंडरॉयड ओरियो (एंडरॉयड गो) आधारित आहे सोबतच हा 1.5गीगाहर्ट्ज क्वॉड-कोर मीडियाटेक 6739 चिपसेट वर चालतो.

कंपनी ने या फोन मध्ये 1जीबी रॅम दिला आहे. फोन मध्ये 16जीबी इंटरनल स्टोरेज आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता झेड61 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 8-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी साठी या फोन मध्ये 5-मेगपिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. सेल्फी चांगली यावी म्हणून फोन च्या फ्रंट पॅनल वर पण फ्लॅश लाईट देण्यात आली आहे.

लावा झेड61 4जी फोन आहे जो ब्लूटूथ, वाईफाई व जीपीएस सारख्या बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह येतो. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. जी एआई टेक्नॉलजी सह येते. ही टेक्नोलॉजी फोन ला फक्त दीर्घकाळ बॅकअप देत नाही तर वेगवेगळ्या अॅप्लीकेशन्स ने केलाल बॅटरी चा वापर पण ​मॉनिटर करते.

लावा झेड61 ब्लॅक आणि गोल्ड कलर वेरिएंट मध्ये 5,750 रुपयांमध्ये विकत घेता येईल. अजून एक बातमी म्हणजे कंपनी लावा झेड61 2जीबी रॅम सोबत सादर करणार आहे, हा वेरिएंट ऑगस्ट महिन्यात सेल साठी उपलब्ध होईल. लावा झेड61 चा 2जीबी रॅम वाला वेरिएंट कपंनी एंडरॉयड गो एडिशन सह सादर करणार नाही.

Published by
Siddhesh Jadhav