16 ऑक्टोबरला लेनोवो घेऊन येत आहे ‘किलर’ फोन, मोठया बॅटरी सह असेल पावरफुल रॅम

लेनोवो आपल्या दमदार स्मार्टफोन्स साठी ओळखली जाते. लेनोवो फोन चांगल्या क्वॉलिटी व शानदार स्पेसिफिकेशन्स सह कमी किंमतीत देते. बर्‍याच काळानंतर लेनोवो भारतात आपली स्मार्टफोन श्रृखंला वाढवण्याची तयारी करत आहे. अशी माहिती मिळाली आहे की लेनोवो कंपनी येत्या 16 ऑक्टोबरला भारतात एका ईवेंटचे अयोजन करणार आहे आणि याच ईवेंटच्या मंचावरून कंपनी आपला नवीन फोन इंडियन मार्केट मध्ये लॉन्च करेल. आशा आहे की 16 ऑक्टोबरला लॉन्च होणारा फोन लेनोवो झेड5 प्रो असेल.

लेनोवो ने 16 ऑक्टोबर साठी मीडिया इन्वाईट पाठवणे सुरू केले आहे. लेनोवो ने सांगितले आहे की कंपनी 16 ऑक्टोबरला राजधानी मध्ये ईवेंटचे अयोजन करेल आणि त्याचदिवशी लेनोवो चा नवीन स्मार्टफोन देशात लॉन्च केला जाईल. लेनोवो जरी 16 ऑक्टोबरला लॉन्च होणार्‍या फोनचे नाव सांगितले नसले तरी चर्चा अशी आहे की हा फोन झेड5 प्रो असेल. लेनोवो ने मीडिया इन्वाईट मध्ये ‘द किलर रिटर्न’ टाइटल वापरले आहे ज्यावरून असे वाटते आहे की हा फोन कदाचीत ‘नोट’ सीरीज मध्ये लॉन्च होईल.

लेनोवो झेड5 प्रो बद्दल काही दिवसांपूर्वी एक लीक समोर आला होता ज्यात फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली होती. या लीक नुसार फोन 2280 x 1440 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.5-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात येईल. लीक नुसार लेनोवो झेड5 प्रो पूर्णपणे बेजल लेस असेल. फोनच्या फ्रंट पॅनल वर वरच्या बाजूला नॉच असेल तसेच यात इन-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात येईल.

लेनोवो झेड5 प्रो कंपनी द्वारा दोन रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो ज्यात 8जीबी रॅम आणि 6जीबी रॅम असतील. हे दोन्ही रॅम वेरिएंट 64जीबी मेमरी, 128जीबी मेमरी आणि 256जीबी च्या इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतील. लीक नुसार लेनोवो आपला फोन क्वालकॉमच्या पावर फुल चिपसेट स्नॅपड्रॅगन 845 सह लॉन्च करेल. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर 20-मेगापिक्सल आणि 16-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल.

लेनोवो झेड5 प्रो मध्ये पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी असल्याचे समोर आले आहे. पण लेनोवो इंडिया ने अजूनतरी 16 ऑक्टोबरला लॉन्च होणार्‍या फोनचे नाव सांगितले नाही. त्यामुळे जो पर्यंत ठोस माहिती समोर येत नहीं तोपर्यंत झेड5 प्रो च्या नावावर पण विश्वास ठेवता येणार नाही. लेनोवो 16 ऑक्टोबरला कोणता फोन लॉन्च करेल याची माहिती आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here