लेनोवो चा 4 कॅमेरे असलेला कीलर स्मार्टफोन के9 लॉन्च, सोबतच 4000एमएएच बॅटरी असलेल्या लेनोवो ए5 ने पण मारली एंट्री

लेनोवो कंपनी मजबूत बिल्ड क्वॉलिटी आणि दमदार स्पेसिफिकेशन्स साठी ओळखली जाते. आपल्या भारतीय फॅन्सची गरज बघून तसेच भारतीय स्मार्टफोन बाजारात आपले स्थान अजून मजबूत करत लेनोवो ने आज एक साथ दोन नवीन स्मार्टफोन देशात लॉन्च केले आहेत. कंपनी ने लेनोवो के9 आणि लेनोवो ए5 स्मार्टफोन देशात लॉन्च केले आहेत. शानदार फीचर्स आणि दमदार स्पेसिफिकेशन्स असलेले हे दोन्ही स्मार्टफोन आॅनलाईन व आॅफलाईन प्लॅटफार्म वर सेल साठी उपलब्ध होतील.

लेनोवो के9
हा स्मार्टफोन कंपनीच्या हिट स्मार्टफोन लेनोवो के8 चा नवीन अपडेटेड वर्जन आहे. स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन मेटल यूनिबॉडी डिजाईन वर बनलेला आहे जो 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिसप्ले ला सपोर्ट करतो. कंपनी ने या फोन मध्ये 2.5 कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड 5.7-इंचाची एचडी+ स्क्रीन दिली आहे.

लेनोवो के9 एंडरॉयड ओरियो वर सादर झाला आहे ज्या सोबत हा 2.0 गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर आणि मीडियाटेक एमटी6762 चिपसेट वर चालतो. कंपनी ने के9 3जीबी रॅम मेमरी सह बाजारात आणला आहे. फोन मध्ये 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी ने वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता लेनोवो ने आपल्या या फोन मध्ये डुअल रियर तसेच डुअल सेल्फी कॅमेरे दिला आहे. फोनच्या बॅक तसेच फ्रंट दोन्ही पॅनल वर 13-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. चांगल्या फोटोग्राफी साठी दोन्ही कॅमेरा सेटअप सोबत फ्लॅश लाईट देण्यात आली आहे.

लेनोवो के9 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअप साठी हा फोन 3,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

लेनोवो ए5
लेनोवो ए5 पण कंपनी ने 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर केला आहे जो 5.45-इंचाच्या एचडी+ रेज्ल्यूशन वाल्या स्क्रीनला सपोर्ट करतो. हा फोन पण एंडरॉयड ओरियो आधारित आहे जो 1.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या क्वॉड-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक एमटी6739 चिपसेट वर चालतो. लेनोवो ने ए5 दोन वेरिएंट्स मध्ये बाजारात आला आहे. एक वेरिएंट 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच दुसऱ्या वेरिएंट मध्ये 2जीबी रॅम मेमरी सह 16जीबी इंटरनल स्टोरेज देनाय्त आली आहे. दोन्ही वेरिएंट्स मधील स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते.

कॅमेरा सेग्मेंट पाहता लेनोवो ए5 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी हा फोन रियर फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 4,000एमएएच ची ताकदवान बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत पाहता लेनोवो के9 को 8,999 रुपयांमध्ये देशात लॉन्च करण्यात आला आहे. तसेच लेनोवो ए5 चा 2जीबी रॅम वेरिएंट 5,999 रुपये तर 3जीबी रॅम वेरिएंट 6,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल . लेनोवो ए5 ब्लॅक व फाइन गोल्ड कलर मध्ये सेल साठी उपलब्ध होईल तर लेनोवो के9 ब्लॅक व ब्लू कलर मध्ये शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरून एक्सक्लूसिव विकत घेता येईल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here