लेनोवो ने लॉन्च केले दोन नवीन स्मार्ट फिटनेस बँड, शाओमी ला मिळेल टक्कर

टेक कंपनी लेनोवो ने लॅपटॉप आणि स्मार्टफोन बाजारात मजबूत स्थान बनवले आहे. अंर्तराष्ट्रीय बाजारात तसेच भारतात पण लेनोवो च्या फॅन फॉलोइंग मोठी आहे. आपल्या प्रोडक्ट्स ची रेंज वाढवत लेनोवो ने भारतात आज आपल्या स्मार्ट डिवाईस लॉन्च
केले आहेत. लेनोवो ने देशात दोन नवीन स्मार्ट बँड लॉन्च केले आहेत जे फॅशन व ट्रेंड मध्ये कूल लुक सोबत फिटनेस ची पण काळजी घेतात.

लेनोवो ने एचएक्स03एफ स्पॅक्ट्रा आणि एचएक्स03 कार्डिओ नावाने दोन स्मार्ट फिटनेस बँड लॉन्च केले आहेत. लेनोवो एचएक्स03एफ स्पॅक्ट्रा ची किंमत 2,299 रुपये ठेवण्यात आली आहे तर लेनोवो एचएक्स03 कार्डिओ 1,999 रुपयांच्या किंमतीवर लॉन्च केला गेला आहे. हे दोन्ही स्मार्ट फिटनेस बँड शॉपिंग साइट फ्लिपकार्ट एक्सक्लूसिव आहेत. लेनोवो एचएक्स03 कार्डिओ आज पासून सेल साठी उपलब्ध होईल तर लेनोवो एचएक्स03एफ स्पॅक्ट्रा येणार्‍या 3 मे पासून फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होतील.

कंपनी ने हे स्मार्ट फिटनेस बँड 160×80 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या लार्ज कलर टीएफटी डिसप्ले वर सादर केले आहेत. बँड चा डिसप्ले 0.96 कलर सपोर्ट करतो. या बँड ची सर्वात मोठी खासियत याचा हार्ट रेंट सेंसिंग टेक्निक आहे जी 24 तासांपर्यंत हार्ट रेट ची माहिती देण्यास सक्षम आहे.

लेनोवो एचएक्स03एफ स्पॅक्ट्रा फुट स्टेप्स, बर्न कॅलरी, डिस्टेंस आणि वाॅकिंग पेस सह एक्टिविटी ट्रॅकर च्या माध्यमातून यूजर्सना माहिती देतो. हा बँड इन​कमिंग कॉल, मेसेज इत्यादि ची सूचना नोटिफिकेशन च्या माध्यमातून देतो. हा बँड आईपी68 रेटिड आहे म्हणजे हा वाटरप्रूफ आहे. या बँड मध्ये मल्टी इंटरफेस आहे ज्यामुळे यूजर्स आपल्या मर्जी नुसार याची थीम बदलू शकतात.

4जीबी रॅम आणि 64जीबी मेमरी सह लॉन्च झाला ओपो ए83

लेनोवो चा हा बँड 128×32 पिक्सल्स वाल्या 0.87 इंचाच्या ओएलईडी डिसप्ले वर सादर करण्यात आला आहे. हा बँड पण इन​कमिंग कॉल, मेसेज, अॅप नोटिफिकेशन तसेच अलार्म ची सूचना लाईट व वाइब्रेशन च्या माध्यमातून देतो. फिटनेस साठी या बँड मध्ये पण फुट स्टेप्स, बर्न कॅलरी, कवर डिस्टेंस आणि वाकिंग पेस ची सूचना मिळते. लेनोवो एचएक्स03 कार्डिओ मध्ये पावर बॅकअप साठी 80एमएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

या दोन्ही स्मार्ट फिटनेस बँड सोबत लेनोवो ने बॉडी फॅट स्केल एचएस11 पण लॉन्च केला आहे जो वजन मोजण्या सोबत बॉडी मास इंडेक्स पण मोजतो. कपंनी ने याची किंमत 1,999 रुपये ठेवली आहे तसेच हा पण मे मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here