भारतात एलजी, सोनी, सॅमसंग, पॅनासोनिक या कंपन्यांचे स्मार्ट टीव्ही प्रसिद्ध आहेत. जर तुम्ही यापैकी एका ब्रँडचा टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही येथे तुम्हाला 43 इंचाच्या 4K एलजी स्मार्ट टीव्हीबद्दल सांगणार आहोत. या LG 4K Ultra HD स्मार्ट एलईडी टीव्हीवर सध्या 17,000 रुपयांची सूट मिळत आहे. एवढेच नाही तर बँक आणि एक्सचेंज ऑफर देखील मिळत आहेत. चला, पुढे तुम्हाला सर्व ऑफर्स, किंमत आणि स्पेसिफिकेशन यांच्याबद्दल तपशीलवार माहिती देत आहोत.
LG 43 इंचाचा 4K Ultra HD Smart TV ची किंमत आणि ऑफर्स
- LG 43 इंचाचा 4K अल्ट्रा एचडी स्मार्ट टीव्हीवर 34 टक्के म्हणजेच 17,000 रुपयांची सूट मिळत आहे. या ऑफरनंतर हा टीव्ही केवळ 32,990 रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो.
- बँक ऑफर्सबद्दल बोलायचे तर येस बँक, एयू बँक, वन कार्ड क्रेडिट कार्ड सारख्या वित्तीय संस्था टीव्हीवर 1,500 रुपयांपर्यंत सूट देत आहेत. त्यामुळे त्याची किंमत आणखी कमी होते.
- बँक ऑफर व्यतिरिक्त ब्रँडद्वारे नो कॉस्ट ईएमआय पर्याय देखील मिळत आहे. ज्याच्या मदतीने 3 ते 9 महिन्यांच्या सुलभ हप्त्यांवर या डिव्हाईसला खरेदी करता येईल.
- तसेच, तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला तुमचा जुना स्मार्ट टीव्ही विकायचा असेल तर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे.
- तुम्हाला सांगतो की ऑनलाईन शॉपिंग साईटवर या एलजी 43 इंचाच्या टीव्हीची पूर्वीची किंमत 49,990 रुपये होती.
LG 43 इंचाच्या 4K Ultra HD Smart TV चे स्पेसिफिकेशन
- मुख्य फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास एलजी 43 इंचाच्या 4K अल्ट्रा एचडी स्मार्ट टीव्ही मध्ये 3840 x 2160 चे पिक्सेल रिझोल्यूशन आणि 60 हर्ट्स रिफ्रेश रेट देण्यात आले आहे.
- उत्कृष्ट ऑडिओ अनुभवासाठी 20 वॉट आऊटपुट असलेले स्पीकर प्रदान करण्यात आले आहेत. यामध्ये एआय साऊंड (व्हर्च्युअल सराउंड 5.1), एआय ध्वनिक ट्यूनिंगचा अनुभव मिळत आहे.
- हा डिव्हाईस A5 एआय प्रोसेसर 4K जेन 6 ने सुसज्ज आहे. यात 1.5 जीबी रॅम आणि 8 जीबी पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे. ब्रँडनुसार हा गेमिंगसाठी देखील एक उत्तम डिव्हाईस आहे.
- ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर हा स्मार्ट टीव्ही वेब ओएस सोबत मिळून एकत्रितपणे कार्य करतो.
- स्मार्ट टीव्हीमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी तीन एचडीएमआय पोर्ट, दोन यूएसबी पोर्ट, ब्लूटूथ 5.0, वाय-फाय अशी अनेक फिचर्स मिळत आहेत.
- या एलजी टीव्ही मध्ये वापरकर्त्यांना नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडिओ, डिस्नी+ हॉटस्टार, ॲपल टीव्ही, जिओ सिनेमा, सोनी लिव्ह, झी5 सारखे अनेक ॲप्स आधीच इंस्टॉल केलेले मिळत आहेत.
- हा अप्रतिम एलजी स्मार्ट टीव्ही 1 वर्षाच्या वॉरंटीसह येतो.















