4,500एमएएच बॅटरी आणि 13-एमपी कॅमेरा सह लॉन्च झाला एलजी एक्स5 (2018)

टेक कंपनी एलजी ने आज आपल्या स्मार्टफोन्स मध्ये अजून एक डिवाईस जोडला आहे. एलजी ने एक्स5 (2018) स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कपंनी ने सध्या हा फोन आपल्या होम मार्केट साउथ कोरिया मध्ये लॉन्च केला आहे तिथे याची किंमत भारतीय करंसी नुसार जवळपास 22,800 रुपये ठेवण्यात आली आहे. आगामी दिवसांमध्ये एलजी हा स्मार्टफोन इतर बाजारांमध्ये पण लॉन्च करू शकते.

एलजी एक्स5 (2018) चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन पण ट्रेंड मध्ये असलेल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 1280 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 5.5-इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 8.0 ओरियो आधारित आहे तसेच 1.5गीगाहर्ट्ज 64बिट आॅक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक 6750 चिपसेट वर चालतो.

कंपनी ने हा फोन 2जीबी रॅम सह सादर केला आहे. फोन मध्ये 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी या फोन मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. एलजी ने आपल्या या फोन मध्ये दोन्ही कॅमेरा सेटअप सोबत एलईडी फ्लॅश दिला आहे.

एलजी एक्स5 (2018) डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. एनएफसी तसेच बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह या फोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. सिक्योरिटी साठी फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. एलजी ने हा फोन दक्षिण कोरियन टेलीकॉम कंपनी सोबत बंडल आॅफर मध्ये सादर केला आहे. एलजी एक्स5 (2018) च्या भारत लॉन्च बद्दल सध्या तरी काहीच बोलता येणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here