एलएमएल (LML) नं अलीकडेच इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये एंट्री करत आपल्या तीन नवीन टू-व्हीलर (LML Electric Scooter, Bike and Cycle)- स्टार (ई-स्कूटर), मूनशॉट (ई-हायपरबाइक) आणि ओरियॉन (ई-बाइक) सादर केल्या होत्या. आता कंपनीनं इलेक्ट्रिक स्कूटर LML Star ची बुकिंग सुरु केली आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर नवीन स्टार ईव्हीसाठी ऑनलाइन बुकिंग सुरु केली आहे आणि ग्राहक कंपनीच्या वेबसाइटवर एक फॉर्म फिल करून ही एकही रुपया न देता रिजर्व करू शकतात.
अशी रिजर्व करा LML Electric Scooter
- सर्वप्रथम कंपनीच्या वेबसाइट https://www.lmlemotion.com/star वर जा.
- त्यानंतर स्क्रॉल करून खाली जा.
- Reserve LML Star च्या खाली फॉर्म भरा.
- त्यानंतर फॉर्म भरून स्कूटर रिजर्व करू शकता.
LML Star Electric Scooter Price आणि Sale
विशेष म्हणजे अजूनही या इलेक्ट्रिक स्कटूरची लाँच डेट समजली नाही. परंतु असं वाटत आहे की कंपनी नवीन वर्षापर्यंत ही इलेक्ट्रिक स्कूटी सादर करू शकते. मीडिया रिपोर्ट्स नुसार LML Star ची किंमत Rs 1 lakh (ex-showroom) असू शकते. हे देखील वाचा: Vodafone-Idea 5G आधी आले हे चार नवीन प्लॅन, कॉलिंगसह मिळेल कधी न संपणारा डेटा
LML Electric Scooter Star
LML च्या इलेक्ट्रिक स्कूटीचं नाव ‘Star’ आहे. तसेच या new LML Star च्या कॉन्सेप्ट मॉडेलची डिजाइन खूप शानदार दिसत आहे. बातमी नुसार, e-scooter मध्ये एक डिस्प्ले पॅनल देखील मिळेल जी कस्टम टेक्स्ट मेसेज दाखवेल. तसेच या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये इंजीनियरिंग, अर्गोनॉमिक्स, गॅजेटरी, आराम, सुरक्षा आणि राइड अनुभवचा शानदार मिश्रण मिळेल.
कंपनीनं केली घोषणा
मीडिया रिपोर्ट्सनुसार एलएमएलचे एमडी आणि सीईओ योगेश भाटिया यांनी म्हटलं आहे की आम्हाला ही घोषणा करताना अत्यानंद होत आहे की आमच्या प्रमुख प्रोडक्ट, एलएमएल स्टारसाठी बुकिंग सुरु झाली आहे. लोक आमच्या वेबसाइटवर जाऊ शकतात आणि एक रुपया खर्च न करता स्कूटर बुक करू शकतात. हे देखील वाचा: 50MP Camera सह लाँच झाला अजून एक नवीन 5G Mobile Phone; पाहा फीचर्स आणि प्राइस
लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.
