Vodafone-Idea 5G आधी आले हे चार नवीन प्लॅन, कॉलिंगसह मिळेल कधी न संपणारा डेटा

Excitel Launches Cheapest 400 Mbps Data Plan Starting Rs 599 Per Month To Counter Jio Fiber

Vodafone-Idea Plan: वोडाफोन-आयडिया (Vi) 5G ची वाट बघत असलेल्या युजर्सना अजून काही काळ वाट पाहावी लागेल. कंपनीनं आतापर्यंत 5G Launch बद्दल कोणतीही ऑफिशियल डेट सांगितली नाही. परंतु, Vi 5G च्या आधी कंपनीनं आपल्या पोस्टपेड युजर्सना खुश करत चार नवीन Plan (Vi Max postpaid plans) सादर केले आहेत, ज्यात अनलिमिटेड कॉलिंग, डेटा सोबतच अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ, डिज्नी+ हॉटस्टार आणि सोनी लिवचं फ्री सब्सक्रिप्शन देत आहे. या प्लॅनची खासियत म्हणजे यातील एका प्लॅनसह वर्षात चार वेळा एयरपोर्ट लाउंजचा अ‍ॅक्सेस देखील मोफत मिळतो. पुढे तुम्हाला कंपनीनं नवीन प्लॅन आणि त्यात मिळणाऱ्या सर्व बेनिफिट्सची माहिती दिली आहे.

Vi Max Postpaid Plans

  • 401 रुपयांचा प्लॅन
  • 501 रुपयांचा प्लॅन
  • 701 रुपयांचा प्लॅन
  • REDX 1101 रुपयांचा प्लॅन

1. 401 रुपयांचा प्लॅन

वोडाफोन-आयडियाच्या 401 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन पाहता यात युजर्सना दर महिन्याला 50जीबी डेटा मिळेल. डेटा लिमिट संपल्यावर देखील ग्राहकांना 1जीबी डेटासाठी फक्त 20 रुपये खर्च करावे लागतील. हा प्लॅन 200जीबी पर्यंतच्या डेटा रोलओव्हर बेनिफिटसह येतो. तसेच, यात वोडा नाइट अनलिमिटेड डेटा देखील ऑफर केली जात आहे. कंपनी या प्लॅनमध्ये दर महिन्याला 3 हजार फ्री एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगसह सोनी लिव मोबाइल, हंगामा म्यूजिक, Vi Movies आणि TV चा फ्री अ‍ॅक्सेस देत आहे. हे देखील वाचा: 50MP Camera सह लाँच झाला अजून एक नवीन 5G Mobile Phone; पाहा फीचर्स आणि प्राइस

2. 501 रुपयांचा प्लॅन

या लेटेस्ट प्लॅनमध्ये कंपनीकडून अनलिमिटेड कॉलिंग आणि दर महिन्याला 3 हजार फ्री एसएमएस सह 90जीबी डेटा आणि रात्री अनलिमिटेड डेटा बेनिफिट ऑफर दिली जात आहे. ओटीटी बेनिफिट्स पाहता यात ग्राहकांना 6 महिन्यांसाठी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ, एक वर्षासाठी डिज्नी+ हॉटस्टार आणि Vi Movies and TV अ‍ॅप सब्सक्रिप्शन फ्री मिळेल.

3. 701 रुपयांचा प्लॅन

पोस्टपेड प्लॅनमध्ये दर महिन्याला अनलिमिटेड डेटासह फ्री व्हॉइस कॉलिंग आणि दर महिन्याला 3 हजार एसएमएसचा लाभ मिळेल. तसेच प्लॅनमध्ये कंपनी 6 महिन्यांसाठी फ्री अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ आणि एक वर्षाचं डिज्नी+ हॉटस्टार सुपर सब्सक्रिप्शन दिलं जात आहे. हे देखील वाचा: सॅमसंग घेऊन येतेय आणखी एक स्वस्त मोबाइल फोन Samsung Galaxy A14 4G; मिळेल 4GB RAM आणि लेटेस्ट Android 13

4. 1101 रुपयांच्या REDX प्लॅन

चार पोस्टपेड प्लॅन पैकी हा एक प्लॅन कंपनीच्या REDX प्लॅन कॅटेगरीमध्ये सादर करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये तिन्ही प्लॅनपेक्षा जास्त बेनिफिट दिले जात आहेत. मिळणारे बेनिफिट्स पाहता या प्लॅनमध्ये अनलिमिटेड डेटासह अनलिमिटेड कॉलिंग आणि दर महिन्याला 3 हजार फ्री एसएमएस सोबतच 6 महिन्यांचा अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ अ‍ॅक्सेस, एक वर्षासाठी डिज्नी+ हॉटस्टार आणि सोनी लिवचं फ्री सब्सक्रिप्शन मिळेल. इतकेच नव्हे तर, या प्लॅनमध्ये तुम्हाला वर्षात चार वेळा एयरपोर्ट लाउंज अ‍ॅक्सेस आणि वर्षातून एकदा 2,999 रुपयांचा इंटरनॅशनल रोमिंग पॅक देखील ऑफर केला जात आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here