शाओमीने गेल्या आठवड्यात Redmi Note 9 सीरीज 5G कनेक्टिविटी सह चीन मध्ये लॉन्च केली होती. कंपनीने या फोन्सच्या भारतातील लॉन्च बद्दल कोणतीही ऑफिशियल माहिती दिली नाही. अलीकडेच माहिती समोर आली होती कि कंपनी भारतात Redmi 9 Power आणि Mi 10i डिसेंबर मध्ये भारत घेऊन येऊ शकते. आता 91मोबाईल्सला टिप्सटर इशान अग्रवाल द्वारे Redmi 9 Power आणि Mi 10i च्या रॅम, स्टोरेज, वेरिएंट आणि कलर ऑप्शनची माहिती मिळाली आहे.
दोन्ही फोन भारतात लवकरच सादर केले जाऊ शकतात. सध्या या हँडसेटच्या लॉन्च डेटची माहिती आली नाही. काही दिवसांपूर्वी दोन्ही डिवाइस को गुगल प्ले कंसोल वर स्पॉट केले गेले होते. तर आता आम्हाला रेडमी 9 पावर आणि मी 10आय ची इंडिया सेंट्रिक डीटेल्सची एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे.
हे देखील वाचा : Vivo V20 Pro 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च, याची किंमत आहे कमी आणि फीचर्स, स्पेसिफिकेशन्स दमदार
आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार Redmi 9 Power दोन रॅम व स्टोरेज मध्ये सादर केला जाईल. यात 4GB+64GB आणि 4GB+128GB चा समावेश असेल. तसेच फोन Green, Blue आणि Black कलर ऑप्शन मध्ये सादर केला जाईल. काही दिवसांपूर्वी लीक मध्ये सांगण्यात आले होते कि चीन मध्ये लॉन्च झालेला Redmi Note 9 4G कंपनी Redmi 9 Power नावाने भारत घेऊन येऊ शकते. पण याबाबत कोणतीही ठोस माहिती नाही त्यामुळे आम्ही रेडमी 9 पावरला इंडियन मार्केटसाठी नवीन डिवाइसचा समजत आहोत.
Mi 10i बद्दल बोलायचे झाले तर हा फोन पण मल्टीपल रॅम व स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला जाऊ शकतो. फोन 6GB+128GB आणि 8GB+128GB वेरिएंट मध्ये सादर केला जाऊ शकतो. तसेच फोन Blue, Black आणि Gradient Orange/Blue कलर मध्ये येऊ शकतो.
हे देखील वाचा : Micromax ने मान्य केले In Note 1 स्मार्टफोन नाही आहे पूर्णपणे ‘Made In India’, फोनच्या निर्मितीत चीनचा पण आहे हात
Xiaomi Mi 10i Redmi Note 9 Pro 5G चा रीब्रँड असल्याचे बोलले जात आहे जो काही दिवसांपूर्वी चीन मध्ये सादर केला गेला होता. Google Play कंसोल लिस्टिंग वरून समजले आहे कि मी 10आय स्नॅपड्रॅगॉन 750G SoC सह 6GB रॅमला सपोर्ट करेल. दुसरीकडे, Redmi 9 Power स्नॅपड्रॅगॉन 662 आणि 4GB रॅम सह शिप केला जाऊ शकतो.
जर Xiaomi Mi 10i खरंच Redmi Note 9 Pro 5G चा रीब्रँड असेल तर आपल्याला काही स्पेक्सबाबत आधीच माहिती मिळालेली आहे. जसे कि 6.67-इंचाच्या FHD + डिस्प्ले सह 120Hz रिफ्रेश रेट, 108MP क्वाड कॅमेरा, 4,8,8mAh ची बॅटरी, आणि 33W फ़ास्ट चार्जिंग. दुर्दैवाने सध्या कंपनीकडून माहिती मिळाली नाही कि कधी Mi 10i आणि Redmi 9 Power भारतात लॉन्च होतील. पण रॅम, स्टोरेज वेरिएंट, आणि कलर ऑप्शनची माहिती आल्यामुळे स्पष्ट झाले आहे कि फोन लवकरच लॉन्च होऊ शकतो.
