Vivo V20 Pro 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च, याची किंमत आहे कमी आणि फीचर्स, स्पेसिफिकेशन्स दमदार

Vivo ने आज भारतीय बाजारात आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत शानदार 5जी स्मार्टफोन सादर केला आहे. कपंनीने हा स्मार्टफोन ‘वी20 सीरीज’ अंतगर्त आणला ज्याने Vivo V20 Pro 5G नावाने मार्केट मध्ये एंट्री घेतली आहे. Vivo V20 आणि Vivo V20 SE नंतर Vivo V20 Pro या सीरीजचा तिसरा स्मार्टफोन बनला आहे. वीवोचा दावा आहे कि वी20 प्रो देशातील सर्वात स्वस्त 5जी फोन्स पैकी एक आहे.

स्टाईलिश डिस्प्ले

Vivo V20 Pro 5G मार्केट मध्ये 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 6.44 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. वीवो वी20 प्रो स्क्रीन 408पीपीई आणि 3000000:1 कॉन्ट्रास्ट रेशियोला सपोर्ट करतो. वीवोचा हा फोन 7.39mm बारीक आहे आणि याचे वजन 170 ग्राम आहे. भारतीय बाजारात हा फोन Midnight Jazz आणि Sunset Melody कलर मध्ये विकत घेता येईल.

पावरफुल प्रोसेसिंग

Vivo V20 Pro अँड्रॉइड 10 वर सादर केला गेला आहे जो फनटच ओएस 11 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 765जी चिपसेट देण्यात आला आहे. हा चिपसेट डुअल मोड 5जी (SA/NSA) वर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी वीवो वी20 प्रो एड्रेनो 620 जीपीयूला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : फक्त 7,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला 4,030एमएएच बॅटरी आणि 13एमपी कॅमेरा असलेला Vivo Y1s

शानदार फोटोग्राफी

वीवो वी20 प्रो स्मार्टफोनची सर्वात मोठी खायियत या फोनचा कॅमेरा सेग्मेंट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर तीन तसेच फ्रंट पॅनल वर दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. फ्रंट कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचे झाले तर हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 44 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो त्यासोबत एफ/2.28 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची सुपर वाइड अँगल लेंस देण्यात आला आहे.

वीवो वी20 प्रोच्या रियर पॅनल वर एफ/1.89 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस + मॅक्रो लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलची मोनो लेंस आहे. या फोनचा सेल्फी कॅमेरा आय ऑटो फोकस टेक्नॉलॉजी सह येतो तसेच रियर कॅमेरा 2.5सीएम पर्यंत मॅक्रो शूटिंग करण्याची क्षमता ठेवतो.

हे देखील वाचा : Micromax ने मान्य केले In Note 1 स्मार्टफोन नाही आहे पूर्णपणे ‘Made In India’, फोनच्या निर्मितीत चीनचा पण आहे हात

ताकदवान बॅटरी

Vivo V20 Pro 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात 4,000एमएएच बॅटरी सह लॉन्च केला गेला आहे. फोन बॅटरी वेगाने चार्ज करण्यासाठी वीवो वी20 प्रो मध्ये 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी देण्यात आली आहे.

वेरिएंट व किंमत

वीवो वी20 प्रो भारतात एकच वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे जो 8 जीबी रॅमला सपोर्ट करतो. या स्मार्टफोन मध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. Vivo V20 Pro 5G भारतीय बाजारात 29,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो ऑनलाइन शॉपिंग साइट्स सोबतच ऑफलाइन रिटेल स्टोर्स वर पण विक्रीसाठी उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here