Categories: बातम्या

Mi Mix 4 मध्ये असू शकतो 100MP प्राइमरी कॅमेरा, स्पेसिफिकेशन झाले लीक

Xiaomi Mi MIX 4 बद्दल आता पर्यंत अनेक लीक्स समोर आले आहेत ज्यात फोनचे अनेक स्पेसिफिकेशन्स पण सांगण्यात आले होते. अलीकडेच एका हरिपोर्ट मध्ये दावा केला गेला होता कि कंपनी येत्या 24 सप्टेंबरला Mi MIX 4 सादर करू शकते.

नवीन रिपोर्ट नुसार हा फोन नवीन डिस्प्ले, दमदार कॅमेरा हार्डवेयर आणि इतर अनेक फीचर्स सह येईल. CNMO च्या रिपोर्ट नुसार Xiaomi Mi Mix 4 मध्ये ‘वाटरफॉल स्क्रीन’ असेल जी Vivo Nex 3 सारखी दिसेल. सांगण्यात आले आहे कि हा डिस्प्ले 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट वाला असेल.

फुल-स्क्रीन डिस्प्लेचा फील देण्यासाठी कंपनी सेल्फी कॅमेरा पॉप-अप मॅकॅनिज्म सह येईल. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि या फोनच्या मागे 100-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा असेल. बोलले जात आहे कि हा तोच 108-मेगापिक्सल सेंसर असेल, जो Xiaomi आणि सॅमसंगच्या भागेदारीत बनला होता.

तसेच शाओमी मी मिक्स 4 मध्ये 40 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल. चार्जिंग स्टँडर्ड्सची माहिती समोर अली नाही पण सोमवारी मी चार्ज टर्बो 30 वॉट वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजी सादर करण्यात आली होती. असे पण सांगण्यात आले कि ते 40 वॉट वायरलेस चार्जिंग टेक्नोलॉजी वर काम करत आहेत.

तसेच सध्या शाओमीने मी मिक्स 4 च्या किमतीची किंवा उपलब्धते बद्दल कोणतीही माहिती दिली नाही. आशा आहे कि लवकरच हा सादर कर केला जाईल. येत्या काळात फोनचे स्पेसिफिकेशन्स समोर येतील.

Published by
Siddhesh Jadhav