Xiaomi ने एप्रिल मध्ये आपल्या ‘नोट सीरीज’ अंतर्गत Mi Note 10 Lite स्मार्टफोन सादर केला होता. हा फोन यूरोपियन मार्केट मध्ये आला होता जो आता भारतात येण्यासाठी तयार आहे. मी नोट 10 लाइट भारतात लॉन्च होईल पण आपल्या देशात या फोनचे नाव असू शकते Xiaomi Mi 10i. शाओमीच्या या फोनशी संबंधित हि माहिती एका लीकच्या माध्यमातून समोर आली आहे ज्यात सांगण्यात आले आहे कि कंपनी लवकरच आपला पावरफुल डिवाईस भारतीय बाजारात आणू शकते.
Mi Note 10 Lite बाबत बोलले जात आहे कि कंपनी हा फोन भारतात Xiaomi Mi 10i नावाने लॉन्च करेल. द टेक गाइ नावाच्या एका टिप्स्टरने फोन संबंधीत हि माहिती दिली आहे. लीक मध्ये शाओमी कॅमेरा ऍपचा स्क्रीनशॉट शेयर केला गेला आहे ज्यात 64मेगापिक्सल क्वॉड कॅमेरा सेटअप असलेल्या मी नोट 10 लाइटचा कोडनेम ‘toco’ दाखवण्यात आला आहे. तसेच 64एमपी क्वॉड कॅमेरा असलेला अजून एक फोन ‘tocoin’ कोडनेम सह इथे दिसत आहे आणि याचे प्रोडक्ट नेम Mi 10i आहे. या ऍपच्या जीवावर दावा केला जात आहे कि Mi Note 10 Lite च Xiaomi Mi 10i नावाने भारतात लॉन्च होईल.
Mi Note 10 Lite will be Rebranded as Mi 10i for Indian market.
codename : tocoin pic.twitter.com/4uxblF72q6— the_tech_guy (@_the_tech_guy) August 9, 2020
Mi Note 10 Lite
ग्लोबल मार्केट मध्ये शाओमी मी नोट 10 लाइट 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.47 इंचाच्या फुलएचडी+ 3डी कर्व्ड एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. शाओमीने आपल्या फोनला फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स वर 3डी कर्व्ड ग्लासची सुरक्षा दिली आहे. Xiaomi ने हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला आहे जो मीयूआई 11 वर चालतो.
Xiaomi ने हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सोबतच 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. कंपनीने फोनचा 8जीबी रॅम वेरिएंट पण सादर केला आहे पण तो बाजारात येण्यास वेळ लागेल. तसेच प्रोसेसिंगसाठी Mi Note 10 Lite आक्टा-कोर प्रोसेसर सह 8एनएम टेक्नॉलॉजी असलेला क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेटला सपोर्ट करतो.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Mi Note 10 Lite क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.89 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX686 सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि तेवढाच अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
Xiaomi Mi Note 10 Lite रियल डुअल सिम फोन आहे जो 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह येतो. सिक्योरिटीसाठी हा फोन कंपनीने इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट टेक्नॉलॉजी सह बाजारात आणला आहे तर पावर बॅकअपसाठी हा फोन 30वॉट फास्ट चार्जिंग असलेल्या 5,260एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. किंमत पाहता मी नोट 10 लाइटचा 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 349 यूरो (जवळपास 28,000 रुपये) आणि 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 399 यूरो (जवळपास 32,500 रुपये) मध्ये लॉन्च केला गेला आहे.















