‘मेड इन इंडिया’ Micromax In सीरीज 2 नोव्हेंबरला करेल धमाकेदार एंट्री! जाणून घ्या फीचर्स

इंडियन स्मार्टफोन बाजारातील चायनीज कंपन्यांना मात देण्यासाठी भारतीय स्मार्टफोन ब्रँड माइक्रोमॅक्सने जबरदस्त तयारी केली आहे. धमाकेदार पुनर्प्रवेश करण्यासाठी तयार Micromax लवकरच भारतीय बाजारात मेड इन इंडिया माइक्रोमॅक्स In-सीरीज सादर करणार आहे, ज्याचा खुलासा स्वतः कंपनीचे को-फाउंडर राहुल शर्मा यांनी गेल्या आठवड्यात केला होता. या घोषणेनंतर फोन गीकबेंच लिस्टिंग मध्ये स्पॉट केला गेला होता. आता एका वेबसाइटने या सीरीजच्या फोन्सच्या काही स्पेसिफिकेशन्स आणि लॉन्च डेटची माहिती दिली आहे.

किंमत आणि लॉन्च डेट

टेक वेबासइट TheMobileIndian च्या एका रिपोर्टनुसार माइक्रोमॅक्सची इन सीरीजच्या फोन्सची बेस किंमत 7 हजार ते 15 हजार रुपयांच्या आत असेल. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि नवीन सीरीज 2 नोव्हेंबरला लॉन्च केली जाऊ शकते. पण अजूनही हँडसेटच्या ऑफिशियल लॉन्च डेटचा खुलासा झाला नाही.

स्पेसिफिकेशन्स

रिपोर्टनुसार माइक्रोमॅक्सच्या फोन्स मध्ये 6.5 इंच एचडी+ डिस्प्ले असेल. तसेच In-सीरीजचा फोन मीडियाटेक हीलियो जी35 प्रोसेसर वर सादर केला जाईल. हा फोन दोन वेरिएंट- 2 जीबी रॅम व 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज आणि 3 जीबी रॅम व 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज मध्ये मिळेल.

इतकेच नव्हे तर पावर बॅकअपसाठी माइक्रोमॅक्सच्या या फोन मध्ये 5000mAh बॅटरी दिली जाईल. सॉफ्टवेयर पाहता फोन स्टॉक अँड्रॉइड वर चालेल. 2 जीबी रॅम असलेल्या वेरिएंट मध्ये फोटोग्राफीसाठी 13 मेगापिक्सल व 2 मेगापिक्सलचे दोन रियर सेंसर असतील. फोन मध्ये पुढच्या बाजूला 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा दिला जाईल.

गीकबेंच लिस्टिंग

गीकबेंच लिस्टिंग वर समोर आले होते कि MicroMax In 1a मध्ये युजर्सना MediaTek MT6765V चिपसेट मिळणार आहे, जो MediaTek Helio P35 प्रोसेसर आहे. या प्रोसेसर सह दमदार परफॉर्मन्ससाठी फोन मध्ये 4 जीबी रॅम देण्यात आला आहे. Micromax In 1a लिस्टिंग मध्ये Android 10 ऑपरेटिंग सिस्टम सह दिसला आहे.

गेल्या आठवड्यात शुक्रवारी माइक्रोमॅक्सचे को-फाउंडर राहुल शर्मा यांनी ट्विटर वर 2 मिनिटांचा एक विडियो पोस्ट करून माइक्रोमॅक्सच्या स्मार्टफोनच्या बाजारातल्या वापसीची माहिती दिली होती. या विडियो मेसेज मध्ये राहुल शर्माने बाजारात माइक्रोमॅक्स गायब होण्यासाठी चीनी हँडसेट कंपन्यांना जबाबदार ठरवले होते. याव्यतिरिक्त वीडियो मध्ये इतर काहीही माहिती मिळाली नव्हती.

सोर्स

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here