Motorola ने काही दिवसांपूर्वी टेक बाजारात आपल्या ‘ई’ सीरीजचा नवीन स्मार्टफोन Moto E6i सादर केला होता. तसेच कंपनी भारतात 19 फेब्रुवारीला Moto E7 Power सादर करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. हा ई7 सीरीजचा दुसरा फोन असेल, याआधी Moto E7 Plus गेल्या वर्षी भारतीय बाजारात सादर केला गेला होता. आता बातमी समोर येत आहे कि कंपनी ई7-सीरीजच्या एका नवीन फोन Moto E7i Power वर काम करत आहे, जो मॉडेल नंबर XT2097-14 सह थायलंड NBTC ऑथोरिटी (via) वर स्पॉट केला गेला आहे.
लिस्टिंग मध्ये असे समोर आले आहे कि “Moto E7i Power” थायलंड मध्ये लवकरच सादर केला जाऊ शकतो. याआधी Moto E7i पावर या महिन्याच्या सुरवातीला ब्लूटूथ SIG सर्टिफिकेशनवर दिसला होता. वेबसाइटवर फोन मॉडेल नंबर XT2097-12 आणि XT2097-13 सह स्पॉट झाला होता.
हे देखील वाचा : जगातील पहिला MediaTek Dimensity 1100 SoC असलेल्या Vivo S9 5G चे फुल स्पेसिफिकेशन्स झाले लीक, लवकरच करेल एंट्री
विशेष म्हणजे, ब्लूटूथ SIG लिस्टिंगमधून असे समजले आहे कि मॉडेल नंबर XT2097-15 “लेनोवो K13” मॉनीकर असेल. त्यामुळे असे वाटत आहे कि लेनोवो K13 आणि मोटो E7i पॉवर एकच फोन आहेत जे वेगवेगळ्या देशांत वेगवेगळ्या नावाने येतील. काही दिवसांपूर्वी 91मोबाईल्सने एक्सक्लूसिव बातमी देऊन सांगितले होते कि टेक कंपनी Lenovo आपल्या ‘के’ सीरीजच्या नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे जो Lenovo K13 नावाने लाॅन्च केला जाईल.
Lenovo K13
फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता, हा फोन 1600 X 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेवर लाॅन्च केला जाईल. फोनचे वजन 200 ग्राम असल्याचे सांगण्यात आले आहे. लेनोवो के13 स्मार्टफोन अँड्रॉइड 10 आधारित असेल ज्यात प्रोसेसिंगसाठी 1.6गीगाहर्ट्ज क्लाॅक असलेला आक्टाकोर प्रोसेसर दिला जाईल. 91मोबाईल्सला मिळालेल्या माहितीनुसार लेनोवो आपला फोन 2 जीबी रॅमवर लाॅन्च करेल त्याचबरोबर 32 जीबी इंटरनल स्टोरेज असेल. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येईल.
हे देखील वाचा : जाणून घ्या कधी लॉन्च होईल कागदाप्रमाणे घडी होणारा iPhone, फीचर्स आणि लुकने करेल Samsung-Xiaomi ची सुट्टी
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Lenovo K13 डुअल रियर कॅमेऱ्यासह लाॅन्च केला जाईल. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाईल त्याचबरोबर हा फोन 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसरला सपोर्ट करेल. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी या फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. लेनोवो के13 डुअल सिम फोन असेल जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करेल. फोन मध्ये चार्जिंगसाठी यूएसबी टाईप सी पोर्ट दिला जाईल.
