Moto G Power 5G (2024) चा फोटो आणि व्हिडिओ लाँचच्या आधी लीक, पाहा डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्स

Highlights

  • Moto G Power 5G वर्ष 2024 मध्ये सादर असू शकतो.
  • या लीक रेंडर मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप दिसत आहे.
  • मोबाइलमध्ये पंच-होल कटआउट डिजाइन देण्यात आला आहे.

मोटरोलाच्या नवीन वर्ष 2024 मध्ये येत्या स्मार्टफोनचा व्हिडिओ आणि इमेज लीकमध्ये समोर आला आहे. हा Moto G Power 5G (2024) नावावरून मार्केटमध्ये एंट्री करु शकतो. परंतु कंपनीने याबाबत अजून घोषणा केलेली नाही. याआधी ही एक्सक्लूसिव्हली माय स्मार्ट प्राइस आणि ऑनलीक्सनं मोबाइलची माहिती शेअर केली होती. यात 5k रेंडर्स आणि 360 डिग्री व्हिडिओचा समावेश आहे. चला, पुढे याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

Moto G Power 5G (2024) डिजाइन (लीक)

  • तुम्ही फोटो स्लाइड मध्ये पाहू शकता की Moto G Power 5G (2024) मोबाइल ग्रे कलरमध्ये दिसत आहे.
  • स्मार्टफोनमध्ये मागील बाजूस एक बड़ा कॅमेरा मॉड्यूल आहे ज्यात ड्युअल कॅमेरा सेटअप दिसत आहे. जो LED फ्लॅशसह आहे.
  • स्मार्टफोनच्या फ्रंट डिस्प्लेवर पंच-होल कटआउट डिजाइन देण्यात आला आहे. लीकमध्ये हे पण सांगण्यात आलं आहे की यात जवळपास 6.7 इंचाचा फ्लॅट डिस्प्ले मिळू शकतो.
  • पावर बटन आणि वॉल्यूम बटन स्मार्टफोनच्या उजव्या बाजूला देण्यात आले आहे. त्याचबरोबर 3.5 मिमी ऑडियो जॅक, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि खालच्या बाजूला एक स्पिकर ग्रिल आहे.
  • तसेच डायमेंशन पाहता हा 167.3 x 76.4 x 8.5 मिमी असण्याची शक्यता आहे.

Moto G Power (2023) चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले: मोटो जी पावर 5जी (2023) मध्ये 6.5-इंचाचा फुल एचडी+ रेजोल्यूशन असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे यावर 120Hz रिफ्रेश रेट मिळतो.
  • प्रोसेसर: स्मार्टफोनमध्ये जबरदस्त परफॉरमेंससाठी ऑक्टा-कोर डीमेंसिटी 930 चिपसेट देण्यात आला आहे.
  • स्टोरेज: स्टोरेजच्या बाबतीत डिवाइस 6GB पर्यंत रॅम + 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.
  • कॅमेरा: कॅमेरा फिचर्स पाहता मोबाइल ट्रिपल कॅमेरा सेटअपसह आहे. ज्यात 50MP चा प्रायमरी, 2MP चा डेप्थ आणि एक 2MP चा मॅक्रो कॅमेरा आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलवर बोलण्यासाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.
  • बॅटरी: बॅटरीच्या बाबतीत स्मार्टफोन 5,000mAh ची बॅटरी आणि 15W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट करतो.
  • कनेक्टिव्हिटी: या फोनमध्ये 11 5G बँड का सपोर्ट, ड्यूल सिम 5जी, 4G VoLTE, WiFi, Bluetooth 5.3 आणि 3.5एमएम हेडफोन जॅक सारखे अनेक फिचर्स मिळतात.
  • ऑपरेटिंग सिस्टम: Moto G Power (2023) फोन अँड्रॉइड 13 ओएस आधारित माययूएक्सवर चालतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here