Xiaomi ने काही दिवसांपूर्वी बाजारात आपली ‘रेडमी नोट’ सीरीज वाढवत तीन नवीन फोन लॉन्च केले होते. या फोन्स मध्ये Redmi Note 9 Pro आणि Redmi Note 9 Pro Max भारतीय बाजारात लॉन्च केले गेले होते. तसेच Redmi Note 9S थायलंड, मलेशिया आणि सिंगापुर मधील बाजारात आला होता. आता शाओमीने आपल्या घरच्या मार्केट मध्ये म्हणजे चीन मध्ये रेडमी नोट 9 सीरीजचे 5जी मॉडेल मध्ये सादर केले आहेत. या सीरीज मध्ये दोन 5G आणि एक 4G फोन सादर केले गेले आहेत.
शाओमीने Redmi Note 9 5G आणि Redmi Note 9 Pro 5G सोबतच Redmi Note 9 4G वर्जन मध्ये पण सादर केला आहे. या हँडसेट बद्दल बोलायचे झाले तर हे ब्रँडच्या नोट सीरीजचे पहिले 5G स्मार्टफोन आहेत. फोन Redmi Note 8 आणि Note 8 Pro चे अपग्रेडेड वर्जन म्हणून सादर केले गेले आहेत. सोबतच Redmi Note 9 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स जवळपास Mi 10T Lite सारखे आहेत, याचा लीक मध्ये पण उल्लेख झाला होता.
Redmi Note 9 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स
Redmi Note 9 Pro 5G बद्दल बोलायचे झाले तर या हँडसेट मध्ये 6.67-इंचाचा FHD+ IPS डिस्प्ले देण्यात आला आहे जो 120Hz रिफ्रेश रेट आणि पंच-होल सेल्फी कॅमेऱ्यासह येतो. फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 750G SoC सह Adreno 619 GPU आहे. इतकेच नव्हे तर फोन मध्ये 6GB LPDDR4 रॅम आणि 128GB UFS 2.1 पर्यंतचा स्टोरेज ऑप्शन आहे. सॉफ्टवेयर पाहता Redmi Note 9 Pro 5G स्मार्टपोन MIUI 12 सह अँड्रॉइड 10 वर चालतो.
Redmi Note 9 Pro 5G मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये 108MP प्राइमरी सेंसर, 13MP अल्ट्रा-वाइड लेंस, 2MP मॅक्रो यूनिट आणि 2MP डेप्थ सेंसर आहे. तसेच फोन मध्ये फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा कॅमेरा देण्यात आला आहे.
हे देखील वाचा : Xiaomi ने आणला पावरफुल फोन Redmi K30s, स्पेसिफिकेशन्स वर टाका एक नजर
फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 4,820mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33W फास्ट चार्जिंग सह येईल. तसेच इतर फीचर्सपाहता फोन मध्ये सुरक्षेसाठी एक साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आणि 5 जी, 4 जी एलटीई, एनएफसी, डुअल-बॅंड वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि चार्जिंग आणि डेटा सिंकसाठी यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे ऑप्शन आहेत.
Redmi Note 9 5G चे स्पेसिफिकेशन्स
Redmi Note 9 5G पाहता यात 6.53-इंचाचा FHD+ पंच-होल डिस्प्ले 60Hz रिफ्रेश रेट सह एलसीडी पॅनल वर येतात. तसेच फोन मध्ये मिड-रेंज मीडियाटेक डाइमेंसिटी 800U SoC आहे. फोन मध्ये 8GB रॅम आणि 256GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी फोन मध्ये 48MP चा मेन सेंसर, 8MP अल्ट्रा-वाइड लेंस, 2MP डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. तसेच व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी Note 9 5G मध्ये 3MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
हैंडसेट अँड्रॉइड 10-बेस्ड MIUI 12 वर चालतो. इतकेच नव्हे तर फोन मध्ये Redmi Note 9 Pro 5G प्रमाणे साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. फोनचे डायमेन्शन 161.96mm × 77.25mm × 9.20mm असे आहेत. डिवाइसचे वजन 200 ग्राम आहे.
Redmi Note 9 4G चे स्पेसिफिकेशन्स
ब्रँडने Redmi Note 9 4G पण सादर केला आहे जो भारतात लॉन्च झालेल्या Redmi Note 9 पेक्षा वेगळा आहे. दोन्ही डिवाइस पेक्षा वेगळा असलेला हा फोन फक्त 4G सपोर्ट सह येतो आणि तिन्ही मध्ये सर्वात किफायतशीर किंमत पण या फोनची आहे. वॉटर ड्रॉप डिस्प्ले आणि ट्रिपल रियर कॅमेरा सिस्टम सह येणाऱ्या या हँडसेट मध्ये 6,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच फोन स्नॅपड्रॅगॉन 662 SoC सह 128GB इंटरनल स्टोरेज सह येतो.
हे देखील वाचा : Micromax In 1b Vs Redmi 9A: जाणून घ्या कोण जिंकेल लो बजेटची लढाई
Redmi Note 9 5G, Redmi Note 9 Pro 5G, Redmi Note 9 4G ची किंमत आणि उपलब्धता
Redmi Note 9 5G च्या 6GB + 128GB वेरिएंटची किंमत RMB 1299 (जवळपास 14,600 रुपये), 8GB + 128GB ऑप्शनची किंमत RMB 1499 (जवळपास 16,900 रुपये) आणि 8GB + 256GB मॉडेलची किंमत RMB 1699 (जवळपास 19,000 रुपये) आहे. तसेच Redmi Note 9 Pro 5G के 6GB + 128GB वेरिएंटची किंमत RMB 1599 (जवळपास 18,000 रुपये), 8GB 128GB ऑप्शनची किंमत RMB 1799 (जवळपास 20,000 रुपये) आणि 8GB + 256GB कॉन्फिगरेशनसाठी RMB 1999 (जवळपास 22,500 रुपये) द्यावे लागतील. सध्या Redmi Note 9 5G आणि Redmi Note 9 Pro 5G च्या भारतातील लॉन्च बद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही.
चीन मध्ये Redmi Note 9 4G ची किंमत आरएमबी 999 (जवळपास 11,200 रुपये) पासून सुरु होते आणि आरएमबी 1499 (जवळपास 16,900 रुपये) पर्यंत जाते.
















