Home बातम्या Moto G13 4G भारतात लाँच! यात आहे 90Hz डिस्प्ले, MediaTek Helio G85 SoC आणि खूप काही

Moto G13 4G भारतात लाँच! यात आहे 90Hz डिस्प्ले, MediaTek Helio G85 SoC आणि खूप काही

Highlights
  • Moto G13 4G ची प्रारंभिक किंमत Rs 9,499 आहे.
  • या स्मार्टफोनची विक्री 5 एप्रिलपासून ऑनलाइन आणि ऑफलाइन होईल.
  • फोन Lavender Blue आणि Matte Charcoal कलरमध्ये आला आहे.

स्मार्टफोन ब्रँड Motorola नं भारतीय टेक मार्केटमध्ये आपला नवीन 4G मोबाइल लाँच केला आहे. कंपनीनं सादर केलेला नवीन फोन Moto G13 4G नावानं आला आहे. फोनची खासियत पाहता यात 90Hz रिफ्रेश रेटसह 6.5-इंचाचा IPS LCD डिस्प्ले आणि MediaTek Helio G85 चिपसेट आहे. तसेच भारतात याची किंमत देखील कमी ठेवण्यात आली आहे कारण हा एक 4जी स्मार्टफोन आहे. चला एक नजर टाकूया मोटो जी13 4जीच्या किंमत, स्पेसिफिकेशन आणि उपलब्धतेवर.

मोटो जी13 4जीची किंमत आणि उपलब्धता

Moto G13 4G दोन स्टोरेज व्हेरिएंट 4GB+64GB आणि 4GB+128GB मध्ये लाँच करण्यात आला आहे, ज्यांची किंमत क्रमशः 9,499 रुपये आणि 9,999 रुपये आहे. तसेच, हा स्मार्टफोन एक्सक्लूसिव्हली ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि प्रमुख रिटेल स्टोर्सवर 5 एप्रिलपासून दोन कलर ऑप्शन – लॅव्हेंडर ब्लू आणि मॅट चारकोलमध्ये उपलब्ध होईल. हे देखील वाचा: Vivo T2 सीरीजच्या इंडिया लाँचची टाइमलाइन लीक; जाणून घ्या माहिती

Moto G13 चे स्पेसिफिकेशन्स

मोटो जी13 4जीचे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 90 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह 6.5 इंचाचा मोठा आयपीएस एलसीडी डिस्प्ले मिळतो. तसेच या एक ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात 50MP क्वॉड पिक्सल कॅमेरा सिस्टम आहे. यात f/1.8 अपर्चर असलेला 50MP चा प्रायमरी कॅमेरा, f/2.4 अपर्चरसह 2MP चे मॅक्रो आणि डेप्थ सेन्सर आहेत. तसेच, स्मार्टफोनमध्ये f/2.0 अपर्चर असलेला 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे. हे देखील वाचा: एक्सक्लूसिव्ह: भारतात पुढील महिन्यात येत आहे Realme Narzo N55, मेमरी आणि कलर व्हेरिएंटची माहिती लीक

तसेच स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G85 चिपसेट आहे ज्यात 4GB पर्यंत रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज आहे. तसेच हा नवीन नियर-स्टॉक Android 13 वर चालतो. कंपनी Android 14 चा अपग्रेड आणि तीन वर्षांचे सुरक्षा अपडेट देणार आहे. स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आहे. तसेच हा फोन IP52 रेटिंग, एक साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि डॉल्बी अ‍ॅटमॉसद्वारे ट्यून करण्यात आलेल्या दोन स्टीरियो स्पिकरसह येतो.