Vivo T2 सीरीजच्या इंडिया लाँचची टाइमलाइन लीक; जाणून घ्या माहिती

Vivo T1
Highlights

  • रिपोर्टनुसार Vivo T2 सीरीज एप्रिलमध्ये भारतात येऊ शकते.
  • सुरुवातीला सीरीजमध्ये दोन मोबाइल फोन्स लाँच केले जाऊ शकतात.
  • Vivo T2 5G आणि T2x स्मार्टफोन अलीकडेच गूगल प्ले कंसोलवर दिसला होता.

अनेक दिवसांपासून अफवा अफवा आहे की चीनी मोबाइल निर्माता कंपनी Vivo आपल्या Vivo T2 सीरीजमध्ये सादर केल्या जाणाऱ्या मोबाइल फोनवर काम करत आहे. आतापर्यंत याबाबत कोणतीही माहिती ऑफिशियल झाली नाही. दरम्यान टेक वेबसाइट Pricebaba नं या आगामी सीरीजच्या इंडिया लाँच टाइमलाइनचा खुलासा केला आहे. रिपोर्टनुसार, भारतात T2 series एप्रिल मध्ये सादर केली जाऊ शकते. कंपनी सुरुवातीला दोन T2-ब्रँडेड स्मार्टफोनची घोषणा करू शकते.

विवो टी2 सीरीज एप्रिलमध्ये होऊ शकते लाँच

रिपोर्टनुसार, विवो टी2 सीरीज भारतात एप्रिलच्या मध्यात लाँच होईल. तसेच असं देखील समोर आलं आहे की क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन आणि मीडियाटेक डायमेंसिटी चिपसेट असलेले दोन डिवाइस सीरीजमध्ये समाविष्ट केले जाऊ शकतात. सध्या फोनच्या अचूक नावांची माहिती तर मिळाली नाही. परंतु, हे विवो टी2 आणि विवो टी2एक्स नावाने सादर केले जाण्याची शक्यता आहे. या दोन्ही स्मार्टफोन्सची देशात किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते. हे देखील वाचा: सामान्य नागरिकांना दिलासा! पॅन-आधार कार्ड लिंक करण्याची मुदत वाढली

गुगल प्ले कंसोलवर लिस्ट झालेले विवो टी2 सीरीजचे फोन

हे दोन्ही हँडसेट काही आठवड्यांपूर्वी Google Play कंसोल लिस्टिंगवर दिसले होते. लिस्टिंगमध्ये समोर आलं होतं की फोन FHD + डिस्प्ले, एक ड्यूड्रॉप नॉच आणि Android 13 सह बाजारात येऊ शकतो. तसेच विवो टी2 (वी2222) क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 एसओसीसह लाँच केला जाऊ शकतो, तर विवो टी2एक्स मध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 700 चिप मिळू शकते. तसेच या दोन्ही स्मार्टफोन्सनंतर येणारे मॉडेल सर्वात किफायतशीर असण्याची शक्यता आहे. हे देखील वाचा: Redmi नं लाॅन्च केला पावरफुल Note 12 Turbo 5G फोन, PUBG सारख्या गेम्ससाठी ठरू शकतो मस्त ऑप्शन

तुमच्या लक्षात असेल गेल्यावर्षी विवोनं भारतात विवो टी1 सीरीजची सुरुवात केली होती. या लाइनअपमध्ये तीन मॉडेल-विवो टी1, विवो टी1 44डब्ल्यू आणि विवो टी1एक्स चा समावेश करण्यात आला होता. हे सर्व फोन iQOO Z6 डिवाइसचे रीब्रँड व्हर्जन होते. परंतु, यावेळी काही रिपोर्ट्सनुसार, विवो टी2 लाइनअप मार्केटमध्ये आलेल्या iQOO Z7 सीरीज पेक्षा वेगळी असेल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here