एक्सक्लूसिव्ह: भारतात पुढील महिन्यात येत आहे Realme Narzo N55, मेमरी आणि कलर व्हेरिएंटची माहिती लीक

Highlights

  • Realme आपल्या नारजो ब्रँडिंग अंतगर्त एन-सीरीज स्मार्टफोन्स घेऊन येत आहे.
  • Realme Narzo N55 पुढील महिन्यात एप्रिलमध्ये भारतात येईल.
  • Narzo N55 Prime Black आणि Prime Blue कलरमध्ये सादर केला जाईल.

रियलमीनं काही दिवसांपूर्वीच आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलच्या माध्यमातून एक नवीन एन-सीरीज प्रोडक्ट बद्दल टीज केलं होतं. ब्रँडनं आतापर्यंत सांगितलं नाही की प्रोडक्ट कोणतं असेल. दरम्यान आता 91mobiles ला इंडस्ट्री सोर्सकडून अपकमिंग स्मार्टफोनबाबत विशेष माहिती मिळाली आहे की हा कोणता फोन असेल. मिळालेल्या माहितीनुसार रियलमीनं अलीकडे जो डिवाइस टीज करण्यास सुरु केलं आहे, त्याला Realme Narzo N55 नाव दिलं जाऊ शकतं. कंपनी Narzo ब्रँडिंग अंतगर्त एक नवीन लाइनअप सादर करू शकते. तसेच आमच्याकडे मेमरी ऑप्शन आणि कलर ऑप्शनची काही माहिती मिळाली आहे. चला यावर एक नजर टाकूया.

Realme Narzo N55 चे मेमरी आणि कलर व्हेरिएंट

आमच्या सोर्सनुसार, रियलमी लवकरच आपल्या Narzo ब्रँडिंग अंतगर्त स्मार्टफोनची एक नवीन सीरीज लाँच करू शकते. पहिला डिवाइस Realme Narzo N55 नावानं सादर केला जाऊ शकतो आणि शक्यतो एप्रिल 2023 की दुसऱ्या आठवड्यात हा लाँच होऊ शकतो. आमच्या सोर्सनं सांगितलं आहे की Realme Narzo N55 प्राइम ब्लॅक आणि प्राइम ब्लू रंग ऑप्शनमध्ये लाँच होऊ शकतो. मेमरी ऑप्शन बद्दल बोलायचं झालं तर डिवाइस अनेक मेमरी कॉन्फिगरेशनसह उपलब्ध होऊ शकतो. बेस व्हेरिएंटमध्ये 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेजसह येऊ शकतो. हे देखील वाचा: Redmi नं लाॅन्च केला पावरफुल Note 12 Turbo 5G फोन, PUBG सारख्या गेम्ससाठी ठरू शकतो मस्त ऑप्शन

तसेच फोनचा 128GB स्टोरेज आणि 4GB रॅमसह एक व्हेरिएंट सादर केला जाऊ शकतो. तसेच, मिड-टियर व्हेरिएंटमध्ये 6GB रॅम आणि 64GB/128GB स्टोरेज मिळू शकते. त्याचबरोबर डिवाइस 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज ऑप्शनमध्ये देखील लाँच केला जाऊ शकतो. हे देखील वाचा: Vivo T2 सीरीजच्या इंडिया लाँचची टाइमलाइन लीक; जाणून घ्या माहिती

उर्वरित स्पेसिफिकेशन्स बाबत सध्यातरी कोणतीही माहिती समोर आली नाही. परंतु Realme Narzo N55 एक मिड-रेंज स्मार्टफोन असण्याची अपेक्षा आहे. पुढील काही दिवसांमध्ये Realme Narzo N55 लाँच बाबत अधिक माहिती समोर येऊ शकते.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here