6,000mAh Battery आणि 12GB RAM सह Moto G64 5G भारतात झाला लाँच, पॉकेट फ्रेंडली आहे किंमत

Moto G64 5G फोन भारतात लाँच झाला आहे. Motorola ने आपल्या या मोबाईलला 12GB RAM आणि MediaTek Dimensity 7025 च्या ताकदीसह सादर केले आहे ज्यात 50MP Camera आणि 6,000mAh Battery ची पावर मिळते. मोटो जी 64 5 जी किंमत, फिचर्स व स्पेसिफिकेशनची संपूर्ण माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Moto G64 5G ची किंमत

  • 8GB RAM + 128GB Storage = ₹14,999
  • 12GB RAM + 256GB Storage = ₹16,999

मोटोरोलाने मोटो जी 64 5 जी फोन दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच केला आहे. याच्या 8 जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे तसेच 12 जीबी रॅम मॉडेलची किंमत 16,999 रुपये आहे. सुरुवाती सेलमध्ये एचडीएफसी कार्ड युजर्सना फोनवर 1 हजाराचा डिस्काऊंट पण मिळेल. Moto G64 5G Mint Green, Pearl Blue आणि Ice Lilac कलरमध्ये फ्लिपकार्टवर 23 एप्रिलपासून उपलब्ध होईल.

Moto G64 5G चे स्पेसिफिकेशन

  • 6.5″ FHD+ 120Hz Display
  • MediaTek Dimensity 7025
  • 12GB RAM + 256GB Storage
  • 50MP Rear Camera
  • 16MP Selfie Camera
  • 6,000mAh Battery
  • 33W Fast Charging

डिस्प्ले : मोटो जी64 5जी फोन 2400 x 1080 पिक्सल रेजोल्यूशन असणाऱ्या 6.5 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेवर लाँच झाला आहे. ही पंच-होल स्टाईल स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे तसेच 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते.

मेमरी : भारतीय बाजारात हा फोन दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. बेस मॉडेलमध्ये 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे तसेच मोठे व्हेरिएंट 12 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेजला सपोर्ट करते. या दोन्ही मध्ये 1 टीबी मायक्रोएसडी कार्ड लावले जाऊ शकते.

परफॉर्मन्स : Moto G64 5G फोन अँड्रॉईड 14 वर लाँच झाले आहे. प्रोसेसिंगसाठी मोबाईलमध्ये 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक डाइमेंसिटी 7025 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला आहे जो 2.5 गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो.

कॅमेरा : मोटो जी 64 5 जी ड्युअल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सल ओआयएस सेन्सर तसेच 8 मेगापिक्सल डेप्थ+मॅक्रो सेन्सरचा समावेश आहे. तसेच सेल्फी काढणे आणि रिल्स बनविण्यासाठी हा फोन 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

बॅटरी : पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 6,000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी मोटोरोलाने आपल्या मोबाईलला 33 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह बनविले आहे.

इतर फिचर्स : मोटो जी 64 5 जी फोनमध्ये 14 5G Bands आहे. हा मोबाईल IP52 रेटिंगसह आला आहे ज्यात NFC आणि Bluetooth 5.3 सह 3.5mm Jack आणि Dolby Atmos Stereo speakers पण मिळतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here