Home बातम्या 10 मार्चला भारतात लाँच होऊ शकतो Moto G73 5G; भारतातील पहिला Dimensity 930 चिपसेट असलेला फोन

10 मार्चला भारतात लाँच होऊ शकतो Moto G73 5G; भारतातील पहिला Dimensity 930 चिपसेट असलेला फोन

Highlights
  • Moto G73 5G फोन 10 मार्चला भारतात लाँच होऊ शकतो.
  • या फोनमध्ये 12 5जी बँडचा सपोर्ट देण्यात आला आहे.
  • मोटो जी73 5जी भारतात लाँच होणारा पहिला डिमेनसिटी 930 चिपसेट असलेला फोन असेल.

Motorola नं वर्षाच्या सुरुवातीला आपल्या ‘जी’ सीरीज अंतगर्त Moto G73 5G लाँच केला आहे. हा मोबाइल फोन आता लवकरच भारतीय बाजारात एंट्री करेल. बातमी आली आहे की येत्या 10 मार्चला हा 5जी फोन भारतात लाँच केला जाईल. कंपनीनं मात्र फोन लाँचची अधिकृत माहिती दिली नाही परंतु ही माहिती टिपस्टर मुकुल शर्माच्या माध्यमातून समोर आली आहे. कंपनीची अनाउंसमेंट होताच ऑफिशियल टीजर ईमेज व व्हिडीओसह हा लेख अपडेट केला जाईल.

Moto G73 5G फोन जानेवारीमध्ये युरोपमध्ये लाँच झाला होता जो मीडियाटेक डिमेनसिटी 930 चिपसेटसह आला होता. विशेष म्हणजे भारतात आतापर्यंत कोणताही मोबाइल फोन या प्रोसेसरसह आला नाही. त्यामुळे मोटो जी73 5जी भारतात लाँच होणारा पहिला डिमेनसिटी 930 स्मार्टफोन असू शकतो. हा मोबाइल 10 मार्चला भारतीय बाजारात एंट्री करेल. हे देखील वाचा: स्वदेशी 5G वापरण्यासाठी येतोय स्वदेशी स्मार्टफोन; लाँच पूर्वीच Lava Agni 2 5G चे स्पेसिफिकेशन्स लीक

Moto G73 5G Specifications

मोटो जी73 5जी फोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह लाँच झाला आहे जो 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन स्क्रीन पंच-होल स्टाईलसह आला ज्यात एलसीडी पॅनलचा वापर करण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 405पीपीआय सारख्या फीचर्सना सपोर्ट करतो. या फोनचे डायमेंशन 161.42 x 73.84 x 8.29एमएम आणि वजन 181ग्राम आहे.

Moto G73 5G फोन अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या मीडियाटेक डिमेनसिटी 930 ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये आयएमजी बीएक्सएम-8-256 जीपीयू आहे. हा फोन 8जीबी रॅमसह 256जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1टीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी मोटो जी73 5जी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 64MP च्या कॅमेऱ्यासह Vivo V27e ची एंट्री; सीरिजमधील सर्वात स्वस्त स्मार्टफोनमध्ये 16GB RAM

Motorola Moto G73 5G फोनमध्ये 12 5जी बँडचा सपोर्ट देण्यात आले आहेत तसेच या मोबाइलमध्ये 4जी नेटवर्क देखील वापरता येतं. एनएफसी, 3.5एमएम जॅक आणि डॉल्बी अ‍ॅटमॉस सारखे शानदार फीचर्स यात आहेत. सिक्योरिटीसाठी स्मार्टफोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा मोटोरोला फोन 30वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.