64MP च्या कॅमेऱ्यासह Vivo V27e ची एंट्री; सीरिजमधील सर्वात स्वस्त स्मार्टफोनमध्ये 8GB RAM

Highlights

  • Vivo V27e मध्ये 64MP चा प्रायमरी कॅमेरा ओआयएस सपोर्टसह देण्यात आला आहे.
  • फोनमधील 4600mAh ची बॅटरी 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
  • हा फोन लॅव्हेंडर पर्पल आणि ग्लॉरी ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध झाला आहे.

Vivo नं काल Vivo V27 आणि Vivo V27 Pro हे दोन स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर केले आहेत. त्याचबरोबर कंपनीनं व्ही सीरिजचा Vivo V27e मलेशियन बाजारात उतरवला आहे. या व्ही सीरिजच्या नव्या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G99 प्रोसेसर, 4600mAh ची बॅटरी, 120Hz AMOLED डिस्प्ले आणि OIS सपोर्ट असलेला 64MP चा कॅमेरा आहे. पुढे आम्ही व्ही27 सीरिजमधील सर्वात स्वस्त स्मार्टफोनची सविस्तर माहिती दिली आहे.

Vivo V27e ची किंमत आणि उपलब्धता

Vivo V27e चा एकच व्हेरिएंट जागतिक बाजारात आला आहे, ज्यात 8 जीबी रॅमसह 256जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. कंपनीनं या मॉडेलची किंमत 1,299 मलेशियन रिंगेट (सुमारे 24,000 रुपये) ठेवली आहे. हा फोन लॅव्हेंडर पर्पल आणि ग्लॉरी ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध झाला आहे. सध्या मलेशियन बाजारातील हा मॉडेल लवकरच भारतात देखील दाखल होऊ शकतो. हे देखील वाचा: Redmi Note 12 4G देखील लाँचसाठी सज्ज; फोनचे फोटो आणि स्पेसिफिकेशन्स आले समोर

Vivo V27e चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.62″ Full HD+ AMOLED display
  • MediaTek Helio G99 processor
  • 8GB RAM 256GB Storage
  • 64MP Triple rear camera
  • 4600mAh battery, 66W fast charging

Vivo V27e मध्ये 6,62 इंचाचा फुल एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 2400 × 1080 पिक्सेल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी यात इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील मिळतो. तसेच यातील पंच होल मध्ये सेल्फी कॅमेरा सेन्सर फिट करण्यात आला आहे.

व्ही सीरिजमधील या किफायतीशीर स्मार्टफोनमध्ये कंपनीनं ऑक्टाकोर MediaTek Helio G99 प्रोसेसरचा वापर केला आहे, जो Mali G57 जीपीयूसह येतो. जोडीला 8जीबी रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच एक्सटेंडेड रॅम फिचरच्या मदतीनं 8जीबी अतिरिक्त रॅम मिळून 16जीबी रॅम मिळवता येतो. हा फोन अँड्रॉइड 13 आधारित फनटचओएस 13 वर चालतो.

Vivo V27e मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात OIS सपोर्ट असलेला 64MP चा प्रायमरी कॅमेरा, 2MP चा मॅक्रो सेन्सर, आणि 2MP चा बोकेह सेन्सर ऑरा लाईट एलईडी फ्लॅशसह देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी कंपनीनं विवो व्ही27ई मध्ये 32MP च्या कॅमेऱ्यासह वापर केला आहे. हे देखील वाचा: स्वदेशी 5G वापरण्यासाठी येतोय स्वदेशी स्मार्टफोन; लाँच पूर्वीच Lava Agni 2 5G चे स्पेसिफिकेशन्स लीक

हा फोन 4600mAh च्या बॅटरीसह बाजारात आला आहे जी 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच यात कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल सिम, 4जी, वायफाय, ब्लूटूथ 5.2, एनएफसी, जीपीएस, टाइप सी पोर्ट आणि 3.5एमएम ऑडिओ जॅक मिळतो. यात के हायब्रीड मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. हा एक IP54 रेटेड स्मार्टफोन असल्यामुळे काही प्रमाणात वॉटर आणि डस्ट रेजिस्टंट बनतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here