लाँच पूर्वीच Lava Agni 2 5G चे स्पेसिफिकेशन्स लीक

Highlights

  • Lava Agni 2 5G बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट झाला आहे.
  • फोनमध्ये 8GB RAM आणि MediaTek Dimensity 1080 दिला जाऊ शकतो.
  • या लावा मोबाइलची किंमत 20 ते 25 हजार दरम्यान असू शकते.

भारतातील टेलिकॉम कंपन्या स्वदेशी आणि नॉन चायनीज बनावटीची उपकरणं वापरून 5G नेटवर्कचा विस्तार करत आहेत. परंतु ते नेटवर्क वापरण्यासाठी चिनी स्मार्टफोन्सना पसंती दिली जात आहे. अशात फक्त इंडियन मोबाइल ब्रँड लावानं Lava Agni 5G स्मार्टफोन सादर करून एक स्वदेशी पर्याय दिला होता. आता बातमी आली आहे की कंपनी आपल्या ‘अग्नी’ सीरीज अंतगर्त देखील नवीन मोबाइल सादर करेल जो Lava Agni 2 5G नावानं लाँच होऊ शकतो. ताज्या लीकमधून लाँचपूर्वीच लावा अग्नी 2 5जी फोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे.

Lava Agni 2 5G ची माहिती टिपस्टर पारस गुगलानीच्या माध्यमातून समोर आली आहे. टिपस्टरनुसार हा मोबाइल फोन बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट झाला आहे जिथे फोनचा मॉडेल नंबर LXX504 असल्याचं सांगण्यात आलं आहे. लिस्टिंगमधून फोनचे अनेक महत्वाचे स्पेसिफिकेशन्स देखील समोर आले आहेत. चर्चा आहे की हा लावा मोबाइल लवकरच भारतात लाँच होऊ शकतो आणि याची किंमत 20 हजार रुपयांच्या आसपास असू शकते. हे देखील वाचा: यंदाही दरवाढीपासून सुटका नाही! एयरटेलचे रिचार्ज प्लॅन महागणार; सुनिल मित्तलनी दिला इशारा

Lava Agni 2 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

  • 6.5″ HD+ 90Hz display
  • 8GB RAM
  • MediaTek Dimensity 1080
  • 50MP Rear camera
  • 16MP Selfie Sensor
  • 44W 5,000mAh battery

समोर आलेल्या माहितीनुसार लावा अग्नी 2 5जी फोन मीडियाटेक डिमेनसिटी 1080 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो. या फोनमध्ये 8 जीबी रॅम मिळू शकतो तसेच बाजारात हा फोन एकापेक्षा जास्त मेमरी व्हेरिएंट्समध्ये एंट्री करू शकतो. हा स्मार्टफोन सर्वात नवीन अँड्रॉइड 13 ओएससह मार्केटमध्ये एंट्री करू शकतो.

Lava Agni 2 5G फोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले मिळू शकतो जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करू शकतो. फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो जो ओआयएस फीचरसह येऊ शकतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करू शकतो. हे देखील वाचा: Redmi Note 12 4G देखील लाँचसाठी सज्ज; फोनचे फोटो आणि स्पेसिफिकेशन्स आले समोर

लावा अग्नी 2 5जी फोनबद्दल सांगण्यात आलं आहे की यात 44वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळू शकते. तसेच पावर बॅकअपसाठी हा मोबाइल फोन 5,000एमएएचच्या बॅटरीसह बाजारात येऊ शकतो. सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here