Home बातम्या Moto X40 जागतिक बाजारात Moto Edge 40 Pro नावानं करू शकतो एंट्री

Moto X40 जागतिक बाजारात Moto Edge 40 Pro नावानं करू शकतो एंट्री

Highlights
  • Motorola Edge 40 Pro च्या जागतिक मॉडेलची किंमत लीक
  • Motorola Edge 40 Pro जागतिक बाजारात ब्लॅक आणि ब्लू कलरमध्ये येणार
  • Motorola Edge 40 Pro गेल्यावर्षी चीनमध्ये Moto X40 नावानं लाँच झाला होता

गेल्यावर्षी चीनमध्ये Moto X40 लाँच केल्यानंतर मोटोरोला आता हा स्मार्टफोन जागतिक बाजारात लाँच करण्यासाठी तयार आहे. हा फोन भारतासह आंतरराष्ट्रीय ग्राहकांना Motorola Edge 40 Pro नावानं उपलब्ध होऊ शकतो. या डिवाइसमध्ये दर्जेदार स्पेसिफिकेशन्स आहेत आणि हा गेल्यावर्षी मार्चमध्ये आलेल्या Motorola Edge 30 Pro ची जागा घेऊ शकतो. आता नव्या रिपोर्ट्समधून Motorola Edge 40 Pro च्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती लीक झाली आहे ज्यात स्टोरेज, कलर ऑप्शन आणि युरोपियन बाजारातील किंमतीचा समावेश आहे.

Motorola Edge 40 Pro ची लीक किंमत आणि कलर ऑप्शन

रिपोर्ट्सनुसार Motorola Edge 40 Pro स्मार्टफोन युरोपात एकाच व्हेरिएंटमध्ये लाँच केला जाण्याची शक्यता आहे. या एकमेव मॉडेलमध्ये 12GB RAM आणि 256GB इंटरनल स्टोरेज मिळू शकते. त्याउलट चीनमध्ये लाँच झालेल्या Moto X40 स्मार्टफोनमध्ये 256GB व्हेरिएंटसह 8GB RAM सह 128GB स्टोरेज आणि 12GB RAM सह 512GB स्टोरेज देण्यात आली होती. हे देखील वाचा: बजेटमध्ये BGMI-PUBG साठी फोन हवा? 16 फेब्रुवारीला भारतात येतोय शानदार गेमिंग फोन iQOO Neo 7 5G

समोर आलेल्या लिक्समधून Motorola Edge 40 Pro च्या कलर व्हेरिएंटची देखील माहिती मिळाली आहे, त्यानुसार हा फोन Moto X40 प्रमाणे ब्लॅक आणि ब्लु कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होऊ शकतो. या स्मार्टफोनची युरोपिन बाजारातील किंमत 850 युरो (सुमारे 74,700 रुपये) असण्याची शक्यता आहे. परंतु Motorola Edge 40 Pro भारतात मात्र 60,000 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध होऊ शकतो, असा आमचा अंदाज आहे.

Motorola Edge 40 Pro चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

Motorola Edge 40 Pro स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा फुल-एचडी+ कर्व डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट 165Hz आहे आणि हा HDR10+ला सपोर्ट करू शकतो. मोटोरोलाचा हा स्मार्टफोन Android 13आधारित MyUI 5.0 वर चालू शकतो. Motorola Edge 40 Proस्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 SoC दिली जाऊ शकते.

Motorola Edge 40 Pro स्मार्टफोनमध्ये ड्युअल SIM 5G स्मार्टफोन Wi-Fi 6E आणि Bluetooth v5.3 सपोर्टसह सादर केला जाऊ शकतो. यात एनर्जी कंजम्शनसाठी MAXE टेक्नॉलॉजी तर तापमान कमी ठेवण्यासाठी 11-लेयर कूलिंग सिस्टम मिळू शकते. Motorola Edge 40 Pro मधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये ओआयएस सपोर्ट असलेला 50-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 50-मेगापिक्सलची वाइड अँगल लेन्स आणि 12-मेगापिक्सलचा टेलीफोटो सेन्सर दिला जाऊ शकतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 60MP चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

मोटोरोलाच्या या फोनमध्ये 4,600mAh ची बॅटरी आणि 125W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह दिली जाऊ शकते. Motorola चा दावा आहे की हा फोन फक्त 7 मिनिटांत 50 टक्के चार्ज होऊ शकतो. Motorola Edge 40 Pro स्मार्टफोनमध्ये 15W वायरलेस चार्जिंग आणि 15W रिवर्स चार्जिंग दिली जाऊ शकते. हे देखील वाचा: अशी संधी पुन्हा मिळणार नाही! Nothing Phone (1) वर सर्वात मोठा डिस्काउंट; जाणून घ्या ऑफर