60MP Selfie कॅमेऱ्यासह Motorola Edge 40 Pro ग्लोबली लाँच; क्वॉलकॉमच्या सर्वात शक्तिशाली प्रोसेसरची ताकदही यात

Highlights

  • Motorola Edge 40 Pro जागतिक बाजारात आला आहे.
  • क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्रोसेसर याला पावर देतो.
  • 125W चार्जिंगनं हा 7 मिनिटांत 0 ते 50% चार्ज करता येतो.

Motorola नं अधिकृतपणे आपला नवीन हायएन्ड स्मार्टफोन Edge 40 Pro लाँच केला आहे. हा मोबाइल फोन सध्या युरोपियन मार्केटमध्ये आला आहे जो लवकरच भारतीय बाजारात देखील येऊ शकतो. 12GB RAM सह हा स्मार्टफोन पावरफुल Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर र चालतो. मोटोरोला एज 40 प्रोचे फोटोज, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती पुढे देण्यात आली आहे.

मोटोरोला एज 40 प्रो चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.67” pOLED display, 165Hz refresh rate
  • Snapdragon 8 Gen 2
  • 12GB LPDDR5X RAM
  • 60MP Selfie Sensor
  • 50MP Triple Rear Camera
  • 4,600mAh battery, 125W fast charging

Motorola Edge 40 Pro क्वॉड कर्व्ड फ्रंट डिजाईन असलेला फोन आहे जो अ‍ॅल्युमिनियम फ्रेम बनला आहे. फोनचे फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स 3डी कोर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टसनं प्रोटेक्ट करण्यात आले आहेत. मोटोरोलानं आपला फोन अँटी-फिंगर प्रिंट बनवला आहे. हा फोन आयपी686 रेटेड आहे ज्यामुळे हा वॉटरप्रूफ बनतो. एज 40 प्रोचे डायमेंशन 161.16 x 74 x 8.59एमएम आणि वजन 199ग्राम आहे.

Motorola Edge 40 Pro मध्ये 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.67 इंचाचा मोठा फुलएचडी+ पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन पीओएलईडी पॅनलवर बनली आहे जी 165हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. मोटोनं आपला हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह सादर केला आहे, ज्याला गोरिल्ला ग्लास विक्टसची सुरक्षा मिळते.

Motorola Edge 40 Pro स्मार्टफोन 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या क्वॉलकॉमच्या पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 सह लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये अँड्रॉइड 13 ओएस देण्यात आला आहे, त्यावर माय यूक्स 4.0 ची लेयर मिळते. हा मोटोरोला मोबाइल 12जीबी एलपीडीडीआर5एक्स रॅम तसेच 512जीबी यूएफएस 4.0 स्टोरेजला सपोर्ट करतो.

मोटो एज 40 प्रो का फोटोग्राफी सेग्मेंट पण दमदार आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 60 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो एफ/2.2 अपर्चर र चालतो. तर फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात एफ/1.8 अपर्चर असलेल्या 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह एफ/2.2 अपर्चर असलेली 50 मेगापिक्सलची 114डिग्री एफओवी अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ/1.6 अपर्चर 12 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स आहे.

Motorola Edge 40 Pro मध्ये पावर बॅकअपसाठी 4,600एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. वेगानं चार्ज करण्यासाठी यात 125वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळते जी कंपनीच्या दाव्यानुसार 7 मिनिटांत 0 ते 50% पर्यंत चार्ज होऊ शकतो तर 20 मिनिटांत फुल चार्ज होऊ शकतो. तसेच हा मोटोरोला मोबाइल 15वॉट वायरलेस चार्जिंग तसेच 8वॉट रिवर्स वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजीवर देखील चालतो.

Motorola Edge 40 Pro ड्युअल सिमला सपोर्ट करतो आणि 5जी व 4जी दोन्ही नेटवर्कवर चालतो. या फोनमध्ये 14 5जी बँड्सचा सपोर्ट देण्यात आला आहे ज्यात ग्लोबलसह भारतातील बँडचा देखील समावेश आहे. हा फोन एनएफसी, ब्लूटूथ 5.3 आणि वायफाय 7 सारख्या फीचर्सला सपोर्ट करतो. तसेच चार्जिंग व डेटा ट्रांसफरसाठी या मोटोरोला फोनमध्ये यूएसबी टाईप-सी पोर्ट पण देण्यात आला आहे.

मोटोरोला एज 40 प्रोची किंमत

Motorola Edge 40 Pro ग्लोबल मार्केटमध्ये सिंगल व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. हा मोबाइल फोन 12 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. याची किंमत €899.99 सांगण्यात आली आहे जी भारतीय करंसीनुसार 81,000 रुपयांच्या आसपास आहे. आशा आहे की भारतीय बाजारात या फोनची प्राइस 60 हजार पर्यंतच्या रेंजमध्ये येऊ शकते. सध्या इंडिया लाँचची कोणतीही ठोस माहिती समोर आली नाही. तर ग्लोबली हा फोन Blue आणि Black कलरमध्ये आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here