मोटोरोलाने आज आपला एक नवीन एज सीरिज स्मार्टफोन ‘Edge 50 Fusion लाँच केला आहे. ब्रँडद्वारे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर या डिव्हाईसला पहिले लाईव्ह करण्यात आले आहे. हा IP68 रेटिंग, 5000mAh बॅटरी, आणि 12 जीबी रॅम, 68 वॉट फास्ट चार्जिंग आणि 50MP कॅमेऱ्या सारख्या अनेक खास फिचर्ससह मार्केटमध्ये आणले आहे. जर तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत आहात तर पुढे याची किंमत आणि स्पेसिफिकेशन सविस्तर जाणून घेऊया.
Motorola Edge 50 Fusion ची किंमत आणि उपलब्धता
- Motorola Edge 50 Fusion स्मार्टफोनला दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये भारतीय बाजारात आणले गेले आहे.
- फोनच्या बेस मॉडेल 8GB रॅम +128 जीबी व्हेरिएंटची किंमत 22,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर टॉप मॉडेल 12 जीबी रॅम +256 जीबी स्टोरेज 24,999 रुपयांचा आहे.
- कंपनी लाँच ऑफर अंतर्गत आयसीआयसीआय बँक कार्डवर 2,000 रुपयांचा इंस्टंट डिस्काऊंट देत आहे ज्याच्या मदतीने बेस मॉडेलला 20,999 रुपये आणि टॉप ऑप्शन 22,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
- डिव्हाईसचा सेल ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट, कंपनी वेबसाईट आणि इतर रिटेल आऊटलेटवर 22 मे पासून सुरु केले जाईल.
- डिव्हाईससाठी फॉरेस्ट ब्लू, मार्शमैलो ब्लू आणि हॉट पिंक सारखे तीन कलर ऑप्शन उपलब्ध असतील.
Motorola Edge 50 Fusion चे स्पेसिफिकेशन
- 6.7 इंचाचा pOLED डिस्प्ले
- स्नॅपड्रॅगन 7 एस जेन 2 चिपसेट
- 12 जीबी रॅम +256 जीबी स्टोरेज
- 50MP रिअर कॅमेरा
- 32MP फ्रंट कॅमेरा
- 5,000mAh बॅटरी
- 68W फास्ट चार्जिंग
- IP68 रेटिंग
- 15 5G बँड
डिस्प्ले: Motorola Edge 50 Fusion स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा 3D कर्व्ड pOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 144Hz रिफ्रेश रेट, 1600nits पीक ब्राईटनेस, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 च्या प्रोटेक्शनसह मिळत आहे.
प्रोसेसर: स्मार्टफोन परफॉरमेंससाठी ब्रँडने यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 एस जेन 2 चिपसेट देण्यात आला आहे. ही चिपसेट 2.4 GHz पर्यंतच्या हाय क्लॉक स्पीड प्रदान करण्यामध्ये सक्षम आहे.
स्टोरेज: मेमरीला सेव्ह करण्यासाठी डिव्हाईसमध्ये 12 जीबी पर्यंत रॅमसह 256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळते.
कॅमेरा: Motorola Edge 50 Fusion फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये OIS सह 50MP Sony LYTIA 700C सेन्सर, 120° फिल्ड ऑफ व्यू आणि 4x मॅक्रो शॉट्सला सपोर्ट असलेला 13MP अल्ट्रा-वाईड-अँगल लेन्स आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कालिंगसाठीसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
बॅटरी: मोबाईलची बॅटरी पाहता कंपनीने यात 68W फास्ट चार्जिंगसह 5,000mAh ची बॅटरी दिली आहे. या टर्बो टेक्नॉलॉजीसह मिनिटांमध्ये डिव्हाईसला फुल चार्ज करण्यामध्ये सक्षम आहे.
ओएस: Motorola Edge 50 Fusion स्मार्टफोनच्या ऑपरेटिंग सिस्टम पाहता हा तुम्हाला अँड्रॉईड 14 सह हेलो युआय प्रदान करतो. तसेच यात 3 वर्षाचे ओएस आणि 4 वर्षाचे सिक्योरिटी अपडेट मिळेल.
इतर: मोबाईलमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 15 5G बँड काला सपोर्ट देण्यात आला आहे. सुरक्षा लक्षात घेता पाणी आणि धूळीपासून वाचणारी IP68 रेटिंग आणि इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरची सुविधा पण आहे.















