48 मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह समोर आला Moto G8, लवकरच होईल लॉन्च

Motorola ने गेल्याच महिन्यात स्मार्टफोन बाजारात आपली ‘मोटो जी’ सीरीज वाढवत दोन नवीन डिवाईस Moto G8 Plus आणि Moto G8 Play लॉन्च केले होते. हे दोन्ही स्मार्टफोन मीड रेंज बजेट मध्ये सादर केले गेले आहेत जे शानदार स्पेसिफिकेशन्स सह येतात. कंपनीने अजूनपर्यंत मोटो जी8 सीरीजचा Moto G8 बाजारात आणला नाही. पण एका नवीन लीक मध्ये या फोनचा प्रोमोशनल वीडियो इंटरनेट वर लीक झाला आहे. हा वीडियो समोर आल्यामुळे फक्त Moto G8 च्या डिजाईन की माहितीच मिळाली नाही तर सोबत अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे.

Moto G8 चा हा प्रोमोशनल वीडियो प्रसिद्ध टिपस्टर इवान ब्लास यांनी शेयर केला आहे. तसे पाहता हा वीडियो फक्त 6 सेकंदांचा आहे पण यात फोनचे फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स दाखवण्यात आले आहेत. वीडियो मधून फोनच्या लुक आणि डिजाईनची संपूर्ण माहिती समोर आली आहे. हा फोन बेजल लेस वॉटरड्रॉप नॉच सह दाखवण्यात आला आहे. फ्रंट पॅनल वर डिस्प्लेच्या खाली रुंद चिन पार्ट आहे तर वरच्या बाजूला ‘यू’ शेप नॉच देण्यात आली आहे.

Moto G8 च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो वरच्या बाजूला वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये एक कॅमेरा सेंसर सर्वात वर आणि वेगळा देण्यात आला आहे तर इतर दोन कॅमेरा सेंसर आणि फ्लॅश लाईट एकाच रिंग मध्ये देण्यात आले आहेत. या कॅमेरा सेटअपच्या खाली सेंसरचे डिटेल पण लिहिण्यात आले आहेत. यात प्राइमरी सेंसर 48 मेगापिक्सलचा असेल. बॅक पॅनल वरच मधोमध फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे जो Moto लोगोच्या आत इम्बेडिड आहे. तसेच लोवर पॅनल वर यूएसबी पोर्ट आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण आहे.

Moto G8 Plus

यात 6.3 इंचाचा फुल-एचडी+ (1080×2280 पिक्सल) आईपीएस एलसीडी डिस्प्ले आहे. आस्पेक्ट रेशियो 19:9 आहे आणि नॉच यू आकाराची आहे. फोन मध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 655 प्रोसेसर सह 4 जीबी रॅम देण्यात आला आहे. तसेच 64 जीबी इंटरनल स्टोरेज आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Moto G8 Plus क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर रियर कॅमेरा सेटअप मध्ये 16 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस, 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि एक मॅक्रो लेंस आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी Moto G8 Plus 25 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Moto G8 Plus डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोनच्या बॅक पॅनल वर फिजिकल फिंरगप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी Moto G8 Plus मध्ये 4,000एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here