मोटोरोला ने आज इंडियन टेक बाजारात कंपनीचा नवीन व दमदार स्मार्टफोन मोटोरोला वन पावर लॉन्च केला आहे. शानदार लुक आणि दमदार स्पेसिफिकेशन्स असलेला मोटोरोला वन पावर 15,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे जो येत्या 5 ऑक्टोबर पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल. चला बघूया मोटोरोला वन पावर चे पावरफुल फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स :
डिजाईन
मोटोरोला वन पावर कंपनी ने मेटल यूनिबॉडी डिजाईन सह सादर केला आहे. हा फोन मोटोरोलाच्या निवडक नॉच डिस्प्ले वाल्या स्मार्टफोन्स पैकी एक आहे. फोनचा डिस्प्ले नॅरो बेजल्स वाला आहे तसेच खालच्या बाजूला बॉडी वर ‘मोटोरोला’ लिहिण्यात आले आहे. बॅक पॅनल वर्टिकल शेप मध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच बॅक पॅनल वर मोटोचा लोगो आहे जो फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड आहे.
डिस्प्ले
फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्यात वरच्या बाजूला नॉच देण्यात आली आहे. मोटोरोला वन पावर 1520 x 720 आस्पेक्ट रेशियो वाल्या 6.2-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले ला सपोर्ट करतो.
रॅम व स्टोरेज
मोटोरोला वन पावर 4जीबी रॅम सह सादर करण्यात आला आहे. हा फोन 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो.
कॅमेरा
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चे दोन रियर कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या रियर व फ्रंट दोन्ही कॅमेरा सेटअप सोबत फ्लॅश लाईट आहे.
ओएस
मोटोरोला वन पावर मध्ये एंडरॉयड वन आहे जो सध्या एंडरॉयड ओरियो ला सपोर्ट करतो. पण एंडरॉयड वन असल्यामुळे या फोनला लवकरच एंडरॉयड च्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड पाई चा अपडेट पण मिळेल.
प्रोसेसिंग
हा फोन आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालतो. तसेच फोन मध्ये ग्राफिक्स साठी एड्रेनो 509 जीपीयू देण्यात आला आहे.
बॅटरी
मोटोरोला वन पावर मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत पावर बॅकअप साठी टर्बो पावर फास्ट चार्जिग सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे जी कंपनीच्या दाव्यानुसार फक्त 20 मिनिटांच्या चार्ज मध्ये 6 तासांचा बॅकअप देऊ शकते.
किंमत
हा फोन ब्लॅक, व्हाईट आणि गोल्डन ह्यू कलर मध्ये लॉन्च झाला आहे. फोन 15,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.















