मोटरोलाचा फ्लॅगशिप स्मार्टफोन Motorola X50 Ultra चीनमध्ये लाँचसाठी तयार आहे. डिव्हाईसला 16 मे ला एंट्री मिळणार आहे. तसेच, सादर होण्याच्या आधी मोबाईलचा गीकबेंच स्कोर समोर आला आहे. ज्यात Qualcomm Snapdragon 8s Gen 3 चिपसेट, 12GB रॅम अँड्रॉईड 14 सारखे पावरफुल फिचर्सची माहिती मिळाली आहे. चला, पुढे लेटेस्ट बेंचमार्किंग लिस्टिंग माहिती सविस्तर जाणून घेऊया.
Motorola X50 Ultra गीकबेंच लिस्टिंग
- नवीन मोटोरोला डिव्हाईसला गीकबेंच प्लॅटफॉर्मवर मॉडेल नंबर XT 2401-2 सह माय स्मार्ट प्राईसने स्पॉट केले आहे. ज्याला Motorola X50 Ultra सांगण्यात आले आहे.
- मोबाईलने गीकबेंच 6.2.0 बेंचमार्क टेस्टच्या सिंगल-कोर राऊंडमध्ये 1946 अंक आणि मल्टी-कोर राऊंडमध्ये 5128 अंक मिळवले आहेत.
- मोटोरोला X50 अल्ट्रा गीकबेंच लिस्टिंगमध्ये 1 + 3 + 4 कोर सह 3.01GHz पीक फ्रीक्वेंसी असणारा ऑक्टाकोर प्रोसेसर असलेला सांगण्यात आले आहे. यात एड्रेनो 735 GPU ची माहिती पण आहे.
- वरती दिलेली माहिती जवळपास निश्चित नाही, त्यामुळे मोबाईलमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 एस जेन 3 प्रोसेसर मिळू शकतो.
- मोटोरोला एक्स 50 अल्ट्रा गीकबेंच लिस्टिंगवरून समजले हे की यात 12GB पर्यंत रॅम असेल.
- ऑपरेटिंग सिस्टम पाहता फोनला Android 14 वर आधारित ठेवले जाऊ शकते
Motorola X50 Ultra चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)
- डिस्प्ले: नवीन फ्लॅगशिप फोन Motorola X50 Ultra मध्ये ब्रँड 6.67 इंचाचा pOLED डिस्प्ले येऊ शकतो. यावर 144Hz रिफ्रेश रेट आणि 2500 निट्स पीक ब्राईटनेस मिळण्याची शक्यता आहे.
- प्रोसेसर: गीकबेंच आणि इतर माहितीनुसार हा फोन बाजारात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 एस जेन 3 चिपसेटसह येऊ शकतो.
- स्टोरेज: स्टोरेजच्या बाबतीत 16GB LPDDR5X रॅम + 1TB पर्यंत पर्यंत UFS 4.0 इंटरनल स्टोरेज दिला जाऊ शकतो.
- कॅमेरा: स्मार्टफोनमध्ये OIS टेक्नॉलॉजीसह 50MP चा प्रायमरी, 50MP चा अल्ट्रा वाइड लेन्स आणि 3x पर्यंत झूम सह 64MP चा टेलीफोटो लेन्स लावला जाऊ शकतो. तसेच, सेल्फीसाठी 50MP चा लेन्स मिळू शकते.
- बॅटरी: डिव्हाईसमध्ये 4500mAh ची बॅटरी आणि 125W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळण्याची शक्यता आहे.
- इतर: हा फोन इन डिस्प्ले फिंगर प्रिंट सेन्सर, पाणी आणि धूळीपासून वाचण्यासाठी IP68 रेटिंग, ड्युअल सिम 5 जी, वायफाय आणि ब्लूटूथ सारखे अनेक पर्यायासह येऊ शकतो.















