फोल्ड फोन्स Tecno Phantom V Flip2 आणि Phantom V Fold 2 5G लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत

टेक्नोने दोन नवीन फोल्डेबल जागतिक बाजारात स्मार्टफोन लाँच केले आहेत. हे Tecno Phantom V Flip2 आणि Tecno Phantom V Fold 2 या नावांनी आले आहेत. यापैकी एक बुक-स्टाईल फोल्ड आणि दुसरा फ्लिप आहे. दोन्ही लूकच्या बाबतीत पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक आहेत. मोबाईल्स मध्येही अनेक एआय फिचर्स आहेत. चला तर मग पुढे नवीन मॉडेल्सची सर्व वैशिष्ट्ये आणि किंमती यांची माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया.

Tecno Phantom V Fold 2 चे डिझाईन

Phantom V Fold 2 रिपलिंग ब्लू आणि कार्स्ट ग्रीन या दोन पर्यायांमध्ये येतो. या स्मार्टफोनमध्ये मार्बल-स्पॅटर्न असलेले फायबरग्लास आणि प्लिटेड लेदर टेक्सचरचे बॅक कव्हर आहे. फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा दिसतो. जो एक समर्पित कॅमेरा आयलॅंड मध्ये समाविष्ट आहे त्याला वरच्या बाजूला ठेवले आहे. तसेच मुख्य आणि कव्हर दोन्ही डिस्प्लेवरील बेझल पातळ आहे सोबतच बिजागरही बऱ्यापैकी पातळ दिसतो.

Tecno Phantom V Fold 2 चे स्पेसिफिकेशन

  • डिस्प्ले: Tecno Phantom V Fold 2 फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला 7.85 इंचाचा एलटीपीओ ॲमोलेड प्रायमरी डिस्प्ले समाविष्ट आहे. तर कव्हर डिस्प्लेचा आकार 6.45 इंच इतका आहे. यावर एलटीपीओ ॲमोलेड पॅनल देखील मिळत आहे.
  • चिपसेट: फोनला परफॉर्मन्ससाठी उत्कृष्ट मीडियाटेक डायमेंसिटी 9000+ चिपसेटने सुसज्ज ठेवण्यात आले आहे. हे 4nm-क्लास टीएसएमसी N4 उत्पादन प्रक्रिया आणि 3.2GHz पर्यंतचे कमाल क्लॉक स्पीड प्रदान करत आहे.
  • स्टोरेज आणि रॅम: ब्रँडने या फ्लॅगशिप बुक स्टाईल फोल्ड मोबाईलमध्ये स्पीडसाठी 12GB रॅम आणि 512GB इंटरनल स्टोरेज दिले आहे.
  • कॅमेरा: फोनच्या मागील बाजूस 50 मेगापिक्सेलचे तीन कॅमेरे आहेत. ज्यामध्ये ओआयएस सोबत 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी ओमनीव्हिजन 1/1.3 इंच आणि 1.2um पिक्सेल आकाराचा आहे. यासोबत 50 मेगापिक्सेलचा पोर्ट्रेट कॅमेरा 2x ऑप्टिकल झूम आणि 20x डिजिटल झूम लेन्स आणि 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाईड कॅमेरा 114-डिग्री एफओव्ही ने सुसज्ज आहे. त्याचबरोबर सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचे दोन कॅमेरेही देण्यात आले आहेत.
  • बॅटरी आणि चार्जिंग: Tecno Phantom V Fold 2 मध्ये 5,750mAh ची मोठी बॅटरी दिली जात आहे. फोन 70W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करतो आणि चार्जरसह येतो. सोबतच 15W वायरलेस चार्जिंगची सुविधा देखील आहे.
  • इतर: यात अनेक प्रकारचे फोल्डेबल फिचर्स देखील समाविष्ट आहेत. हे विविध प्रकारचे एआय कॅमेरा आणि इतर फिचर्स देखील देत आहे.
  • वजन आणि डायमेशन: Tecno Phantom V Fold 2 ला उघडल्यावर 159 x 160.35 x 5.52 मिमी आणि फोल्ड असल्यावर 159 x 72.16 x 11.78 मिमी चा आहे. तर त्याचे वजन 249 ग्रॅम आहे.

Tecno Phantom V Flip2 चे स्पेसिफिकेशन

  • डिस्प्ले: Techno Phantom V Flip 2 मध्ये मागील बाजूस मोठा 3.64 इंचाचा पॅनेल आहे. जो कॅमेऱ्यांच्या चारही बाजूस आहे. तर फोनचा प्रायमरी डिस्प्ले 6.9 इंचाचा ठेवण्यात आला आहे. हा एलटीपीओ ॲमोलेड पॅनेल आहे आणि फुलएचडी+ रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट तसेच 2,160Hz पीडब्लूएम डिमिंग सपोर्ट देत आहे.
  • चिपसेट: Tecno Phantom V Flip2 फोनमध्ये परफॉर्मन्ससाठी ब्रँडने मीडियाटेक डायमेंसिटी 8020 चिपसेट लावला आहे. ही 6nm चीप आहे ज्याची कमाल क्लॉक स्पीड 2.6GHz आहे.
  • स्टोरेज आणि रॅम: हा डिव्हाईस 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्पेससह लाँच करण्यात आला आहे.
  • कॅमेरा: कॅमेरा फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास Tecno Phantom V Flip2 मध्ये 50 मेगापिक्सेलच्या प्रायमरी कॅमेऱ्यासह 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाईड कॅमेरा दिला आहे. तर फ्रंटमध्ये ग्राहकांना 32 मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळतो.
  • बॅटरी आणि चार्जिंग: नवीन Tecno Flip डिव्हाईस 4,720mAh च्या बॅटरीसह येतो. तिला जलद गतीने चार्ज करण्यासाठी कंपनीने 70W वायर्ड चार्जिंगची सुविधा दिली आहे.
  • वजन आणि डायमेशन: हा मोबाईल उघडल्यावर 170.74 x 73.4 x 7.64 मिमी आणि फोल्ड असल्यावर 87.8 x 73.4 x 16.04 मिमी चा आहे. तर त्याचे वजन 196 ग्रॅम आहे.
  • रंग: Tecno Phantom V Flip2 मूनडस्ट ग्रे आणि ट्रॅव्हर्टाईन ग्रीन या दोन रंगांमध्ये लाँच करण्यात आला आहे.

Phantom V Fold 2 आणि Phantom V Flip2 ची किंमत आणि उपलब्धता

  • Techno Phantom V Fold 2 ची किंमत 1,099 डॉलर्स म्हणजेच भारतीय दरानुसार सुमारे 93 हजार रुपये ठेवण्यात आली आहे.
  • Techno Phantom V Flip 2 ची किंमत 699 डॉलर्स म्हणजेच अंदाजे 58 हजार रुपये आहे.
  • Tecno Phantom V Fold 2 आणि Phantom V Flip 2 सध्या आफ्रिका, दक्षिणपूर्व आशिया, मध्य पूर्व, लॅटिन अमेरिका यांसारख्या देशांमध्ये उपलब्ध असतील. त्यांची पहिली विक्री आफ्रिकेत 23 सप्टेंबरपासून सुरू होईल.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here