आधारकार्ड असून देखील या लोकांना आता मिळणार नाही Mobile SIM card, जाणून घ्या सरकारी नियम

Airtel, Jio, Vi आणि BSNL भारतातील चार प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत ज्या देशातील कोट्यवधी ग्राहकांना मोबाईल सेवा देत आहेत. सध्या या कंपन्यांचे कोट्यवधी ग्राहक आहेत आणि रोज हजारो नवीन SIM card इश्यू होत असतात तसेच नवीन मोबाईल नंबर सक्रिय केले जातात. आपल्या युजर्सच्या सुविधेसाठी या दूरसंचार कंपन्या कमीत कमी डाक्यूमेंटेशन प्रोसेससह सिम कार्ड विकण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे कंपनीचा युजर बेस वाढवता येतो. परंतु भारत सरकारनं सिम कार्डच्या नियमांमध्ये बदल केला आहे. नवीन नियमांतर्गत 18 वर्षांखालील ग्राहकांना तसेच इतर काही युजर्सना नवीन सिम विकता येणार नाही.

SIM card च्या नव्या नियमांमुळे एकीकडे अनेक लोकांसाठी नवीन सिम घेणं सोपं झालं आहे तर काही कस्टमर्ससाठी नवीन सिम कार्ड घेणं कठीण ठरत आहे. या नियमांमध्ये सर्वात मोठा अपडेट असा आहे की, भारतात 18 वर्षांखालील मोबाईल युजर आता त्यांच्यासाठी कोणत्याची कंपनीचं सिम कार्ड विकत घेऊ शकणार नाहीत. रिलायन्स जियो, एयरटेल, वोडफोन आयडिया व बीएसएनएल या कंपन्या 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या ग्राहकांना सिम कार्ड विकू शकणार नाहीत.

या युजर्सना मिळणार नाही नवीन SIM

सप्टेंबर 2021 च्या कॅबिनेटद्वारे अप्रूव्ड टेलीकॉम रिफॉर्म्सनुसार DoT म्हणजे डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशनच्या नियमांतर्गत पुढील तीन ग्राहकांना नवीन सिम कार्ड देण्यास मनाई करण्यात आली आहे:

1. टेलीकॉम डिपार्टमेंटनुसार कोणतीही कंपनी 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या युजर्सना नवीन सिम देणार नाही.

2. मानसिक रुग्ण किंवा मानसिक अस्थिर व्यक्तीला देखील नवीन सिम कार्ड जारी करता येणार नाही.

3. Aadhaar based e-KYC न करणाऱ्या ग्राहकांना देखील नवीन सिम इश्यू करता येणार नाही.

Online SIM Apply

सरकारनं सिम कार्ड देण्याच्या नियमांमध्ये बदल करून एकीकडे 18 वर्षांखालील ग्राहकांच्या अडचणी वाढवल्या आहेत. तर दुसरीकडे 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी नवीन सिम कार्ड विकत घेण्याची प्रक्रिया अजून सोपी करण्यात आली आहे. नवीन नियमांतर्गत कोणताही भारतीय ग्राहक घर बसल्या ऑनलाइन पद्धतीनं नवीन सिम कार्डसाठी अप्लाय करू शकतो. Online SIM Apply केल्यानंतर SIM Card देखील घरी डिलिव्हर करण्यात येईल.

Aadhaar based e-KYC नवीन सिमसाठी आवश्यक

नवीन सिम कार्ड मिळवणं सोपं झालं आहे तसेच या प्रक्रियेसाठी कोणत्याही मोबाईल शॉप किंवा रिटेल स्टोरच्या चकरा मारण्याची गरज नाही. New Mobile Connection म्हणजे नवीन सिम घेण्यासाठी UIDAI च्या Aadhaar बेस्ड e-KYC सर्व्हिसचा वापर करावा लागेल. या प्रोसेसमध्ये मोबाईल युजरना 1 रुपया शुल्क द्यावे लागेल, याव्यतिरिक्त कोणताही फोटो किंवा आयडी दुकानावर जमा करावा लागणार नाही. डिजीलॉकरमध्ये स्टोर केलेलं डॉक्यूमेंट या केवायसीमध्ये वापरता येईल आणि ते काम देखील ऑनलाइन पद्धतीनं होईल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here