नोकिया ने मे महिन्यात आपल्या बजेट स्मार्टफोन नोकिया 3 ला अजून एडवांस करत फोन चा अपग्रेड मॉडेल नोकिया 3.1 अंर्तराष्ट्रीय मंचावर सादर केला होता. नोकिया ने नोकिया 3.1 सोबत नोकिया 5.1 आणि नोकिया 2.1 पण सादर केले होते. नोकिया 3.1 सादर करताना नोकिया ने दावा केला होता कि हा स्मार्टफोन आपल्या जुन्या वेरिएंट पेक्षा 50 टक्के अधिक फास्ट असेल. आज कंपनी ने हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला आहे.
नोकिया 3.1 मध्ये शानदार लुक सोबत चांगले स्पेसिफिकेशन्स आहेत. फोन मध्ये 18:9 आस्पेक्ट रेशिया वाला बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे जो ऐज एल्युमीनियम डिजाईन वर बनलेला आहे. नोकिया 3.1 5.2-इंचाच्या एचडी+ स्क्रीन सह सादर करण्यात आला आहे तसेच हा स्क्रॅच पासून वाचावा यासाठी 2.5डी कर्व्ड कोर्निंग गोरिल्ला ग्लास ने प्रोटेक्ट करण्यात आला आहे.
नोकिया 3.1 एंडरॉयड वन आधारित एंडरॉयड ओरियो सह सादर करण्यात आला आहे जो 1.5गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक 6750 चिपसेट वर चालतो. नोकिया कडून हा फोन 2 वेरिएंट मध्ये सादर करण्यात आला आहे. एक वेरिएंट 2जीबी रॅम सह 16जीबी मेमरी ला सपोर्ट करतो तर दुसर्या वेरिएंट मध्ये 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. दोन्ही वेरिएंट ची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 128जीबी पर्यंत वाढवता येईल.
फोटोग्राफी डिपार्टमेंट पाहता नोकिया 3.1 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह आॅटोफोकस टेक्नोलॉजी वाला 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला. तर सेल्फी साठी हा फोन 8-मेगापिक्सल च्या फ्रंट कॅमेरा ला सपोर्ट करतो. फोन मध्ये 3.5एमएम जॅक सोबत बेसिक कनेक्टिविटी फीचर्स पण देण्यात आले आहेत. नोकियाचा हा फोन एआर अॅप्स ला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 2,990 एमएएच ची बॅटरी आहे.
नोकिया 3.1 चा 2जीबी रॅम वेरिएंट भारतात 10,499 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन ब्लू/कॉपर, ब्लॅक/क्रोम आणि व्हाईट/आयरन कलर वेरिएंट मध्ये सादर करण्यात आला आहे जो येत्या 21 जुलै पासून देशात सेल साठी उपलब्ध होईल. पण फोन च्या 3जीबी रॅम वेरिएंट साठी अजूनही काही दिवसांची वाट बघावी लागेल. हा फोन आॅनलाईन प्लॅटफॉर्म पेटीएम आणि आॅफलाईन रिटेल स्टोर्स वरून पण विकत घेता येईल.
वोडाफोन आणि आइडिया कडून नोकिया 3.1 च्या यूजर्सना 149 रुपयांच्या पॅक वर 28 दिवसांसाठी रोज 1जीबी डाटा दिला जाईल. पेटीएम कडून या नवीन स्मार्टफोन च्या खरेदीवर 10 टक्क्यांचा कॅशबॅक दिला जात आहे. त्याचबरोबर पेटीएम आपल्या यूजर्सना 250 रूपयांची दोन फ्री मूवी टिकिटे पण देत आहे. नोकिया 3.1 वर आईसीआईसीआई बँक कार्ड धारकांना 5 टक्क्यांचा कॅशबॅक पण मिळेल.
















