Nokia 5.2 चा लाइव फोटो झाला लीक, 4 कॅमेऱ्यांसह होऊ शकतो लॉन्च

नोकिया ब्रँडचे फोन बनवणारी फिनलँडची कंपनी एचएमडी ग्लोबल या महिन्यात होणाऱ्या MWC 2020 इवेंट मध्ये 23 फेब्रुवारीला आपल्या इवेंटचे आयोजन करेल. कंपनीचा इवेंट बार्सिलोनाच्या स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 4 वाजून 30 मिनिटे (भारतीय वेळेनुसार 9 वाजता) सुरु होईल. आशा आहे कि कंपनी या इवेंट मध्ये Nokia 8.2 5G, एक एंट्री लेवल फोन आणि फीचर फोन सोबत Nokia 5.2 सादर करू शकते. तसेच आता एक नोकिया फोन ऑनलाइन समोर आला आहे, ज्याबाबत बोलले जात आहे कि हा नोकिया 5.2 असेल. तसेच फोनचे फोटो, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत समोर आली आहे.

Evan Blass (@evleaks) यांनी ट्विट करून फोन बाबत माहिती दिली आहे. ट्विट मध्ये फोनचे कोडनेम Captain America ठेवण्यात आले आहे. डिवाइस 6जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज सह सादर केला जाईल. फोनची स्क्रीन साइज आणि बॅटरी क्षमतेची माहिती समोर आली नाही. तसेच डिवाइसच्या प्रोसेसर बद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही. याव्यतिरिक्त ट्विट मध्ये डिवाइसच्या किंमतीबद्दल पण माहिती देण्यात आली आहे. लीकनुसार नोकिया 5.2 180 डॉलर (जवळपास 12,000 रुपये) मध्ये 4 मार्चला सादर केला जाईल. पण अजूनही कंपनीने डिवाइस बाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

डिजाइन

डिजाइन बद्दल बोलायचे तर Nokia चा हा फोन वॉटर ड्रॉप नॉच सह येईल. फोनच्या बॉटमला थोडी रुंद बेजल दिला जाईल. तसेच फोन मध्ये तीन नेविगेशन बटण असतील. डिवाइसच्या मागे सर्कुलर कॅमेरा सेटअप असेल. फोन मध्ये पिल-शेप एलईडी फ्लॅश मधोमध असेल आणि त्याच्या चारही बाजुंनी चार कॅमेरा असतील. कॅमेरा सेटअपच्या खाली फिंगरप्रिंट सेंसर असेल. फोनचा बॅक ग्लास्टिक कर्व्ड डिजाइन सह येईल.

विशेष म्हणजे कि कंपनी MWC 2020 मध्ये आपल्या इवेंट मध्ये Nokia 400 4G फीचर फोन 4जी कनेक्टिविटी सह सादर करू शकते. कंपनी या फोनची अधिकृत माहिती दिली नाही पण असे बोलले जात आहे कि फोन लवकरच ग्लोबल मार्केट मध्ये येईल. तसेच भारतीय यूजर्ससाठी चांगली बातमी अशी आहे कि Nokia 400 4G इंडियन मार्केट मध्ये पण लॉन्च केला जाईल. नोकिया 400 4जी फीचर फोन असेल जो लवकरच कमी किंमतीत बाजारात सेलसाठी उपलब्ध होईल.

सोर्स

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here