नोकियाचे मोबाईल बनवणाऱ्या कंपनी एचएमडी ग्लोबलने फेब्रुवारी मध्ये झालेल्या मोबाईल वर्ल्ड कांग्रेस 2019 मध्ये आपले 5 नवीन फोन लॉन्च केले होते. या 5 फोन्स मध्ये नोकिया 9 प्योरव्यू, नोकिया 3.2, नोकिया 4.2, नोकिया 1 प्लस आणि नोकिया 210 यांचा समावेश होता. अशा होती कि कंपनी नोकिया 6.2 लॉन्च करेल. पण असे नाही झाले. आत माहिती समोर आली आहे कि हा फोन येत्या महिन्यात सादर केला जाईल.
दावा करण्यात आला आहे कि नोकिया 6.2 वसंतात येईल. युरोपात वसंत ऋतू मार्चच्या शेवटी सुरु होऊन जून पर्यंत असतो. या आधवरावर म्हणूं शकतो कि नोकिया 6.2 येत्या तिमाहीत लॉन्च केला जाईल. पण डिवाइसच्या लॉन्च बद्दल कोणतीही ऑफिशियल माहिती समोर आली नाही. काही दिवसांपूर्वी नोकिया 6.2 च्या किंमती बद्दल माहिती आली होती. विशेष म्हणजे ‘नोकिया एन्यू’ नावाच्या एका ट्विटर यूजर ने दावा केला आहे कि नोकिया 6.2 येत्या महिन्यात रिलीज होईल आणि या फोनची किंमत नोकिया 6.1 च्या आसपास असेल.
नोकिया 6.1 प्लस चे स्पेसिफिकेशन
फोन चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 5.8-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1080 × 2280 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करतो याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. स्क्रॅच पासून वाचण्यासाठी नोकिया 6.1 प्लस 2.5डी गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे.
नोकिया चा हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो सह स्टॉक एंडरॉयड वर सादर करण्यात आला आहे जो एंडरॉयड पी वर अपडेट होईल. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालतो. भारतात हा फोन 4जीबी रॅम आणि 64जीबी मेमरी वेरिएंट सादर करण्यात आला आहे.
आमचा 5जी फोन रेडी आहे, आम्ही कधीही लॉन्च करू शकतो: आदित्य बब्बर
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा सेटअप 16-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल च्या दोन कॅमेरा सेंसर ला सपोर्ट करतो जे बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी साठी नोकिया 6.1 प्लस मध्ये 16-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. नोकिया 6.1 प्लस च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे आणि या फोन मध्ये फेस अनलॉक टेक्नोलॉजी पण आहे. नोकिया 6.1 प्लस मध्ये 4जी वोएलटीई व बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोन मध्ये 3,060एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे