4जीबी रॅम व 6-इंचाच्या ​बेजल लेस डिसप्ले सह लॉन्च झाला रियलमी 1 सिल्वर लिमिटेड एडिशन

ओपो ने मागच्या महिन्यात आपला सब ब्रांड रियलमी सादर करत या ब्रांड चा पहिला स्मार्टफोन रियलमी 1 लॉन्च केला होता. रियलमी 1 ने बाजारात येताच इंडियन टेक मार्केट च्या दिग्गज कपंनी शाओमी ला चांगलीच टक्कर दिली आहे. रियलमी ने आपला हा शानदार डिवाईस शॉपिंग साइट अमेजॉन इंडिया सोबत मिळून लॉच केला होता. बाजारात हिट झाल्यावर आता रियलमी ने या फोन चा अजून एक सिल्वर लिमिटेड एडिशन पण सादर केला आहे.

रियलमी द्वारा रियलमी 1 सिल्वर लिमिटेड एडिशन 4जीबी रॅम आणि 64जीबी मेमरी सह बाजारात सादर केला आहे. या स्पेशल एडिशन ची किंमत 10,990 रुपये ठेवण्यात आली आहे तसेच हा मॉडल पण अमेजॉन वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल. रियलमी 1 सिल्वर लिमिटेड एडिशन येणार्‍या  18 जून पासून पाहिल्या सेल साठी उपलब्ध होईल. रियलमी 1 चा 3जीबी रॅम वेरिएंट 8,990 रुपयांच्या किंमतीत सेल साठी उपलब्ध झाला आहे तसेच फोन चा 6जीबी रॅम वेरिएंट 13,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

रियलमी 1 सिल्वर लिमिटेड एडिशन के फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा रॅम व स्टोरेज व्यतिरिक्त रियलमी 1 च्या इतर वर्जन सारखाच आहे. हा फोन पण ट्रेंड मधील बेजल लेस डिस्प्ले सह सादर केला गेला आहे. कपंनी ने हा फोन 2160 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन कलरओएस 5.0 आधारित एंडरॉयड 8.1 ओरियो वर सादर करण्यात आला ज्या सोबत 2.0गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो पी60 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी फोन मध्ये माली-जी72 जीपीयू आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 8-मेगापिक्सल च्या सेल्फी कॅमेरा ला सपोर्ट करतो. रियलमी1 डुअल सिम फोन आहे जो दोन्ही सिम 4जी वोएलटीई नेटवर्क वर चालण्यास सक्षम आहेत. या फोन मध्ये फेस अनलॉक टेक्निक आहे तसेच याच्या फ्रंट किंवा बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह पावर बॅकअप साठी 3,410एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here