Nokia नं बाजारात आणला स्वस्त C110 फोन; ह्यात आहे 3GB रॅम, 13MP कॅमेरा

Highlights

  • Nokia C110 यूएस मार्केटमध्ये सादर झाला आहे.
  • ह्यात एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे.
  • हा फोन 8,000 रुपयांचा आहे.

नोकियानं आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत सी-सीरीजचा विस्तार केला आहे. ह्यात कंपनीनं C110 स्मार्टफोन यूएस मार्केटमध्ये सादर केला आहे. खास बाब म्हणजे हा डिवाइस अत्यंत कमी किंमतीया आला आहे. नवीन मोबाइल फोनमध्ये युजर्सना 4G कनेक्टिव्हिटी, 6.3 इंचाचा डिस्प्ले, 3GB रॅम सारखे अनेक फीचर्स मिळत आहेत. तुम्ही पुढे सर्व स्पेसिफिकेशन आणि किंमत पाहू शकता.

Nokia C110 ची किंमत

कंपनीनं यूएस मार्केटमध्ये Nokia C110 स्मार्टफोन सिंगल स्टोरेज ऑप्शनमध्ये आणला आहे. ह्याची किंमत 99 यूएस डॉलर म्हणजे सुमारे 8,000 रुपये आहे. फोनसाठी युजर्सना फक्त एक ग्रे कलर मिळेल. हा डिवाइस भारतात कधी लाँच होईल ह्याची माहिती अजूनतरी स्पष्ट झाली नाही.

Nokia C110 चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : Nokia C110 स्मार्टफोनचे फीचर्स पाहता डिवाइसमध्ये 6.3 इंचाचा एलसीडी एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. ह्यात 400 निट्स ब्राइटनेस, 20 : 9 अ‍ॅस्पेक्ट रेशियो आणि 720 x 1560 रिजॉल्यूशन मिळते.
  • प्रोसेसर : डिवाइसमध्ये चांगल्या परफॉर्मन्ससाठी कंपनीनं ऑक्टा कोर MediaTek Helio P22 चिपसेट दिला आहे.
  • स्टोरेज : स्टोरेजच्या बाबतीत डिवाइसमध्ये 3GB रॅम आणि 32जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. इंटरनल स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देखील देण्यात आला आहे ज्याच्या मदतीनं 256GB पर्यंत स्टोरेज वाढवता येते.
  • कॅमेरा : कॅमेरा फीचर्स पाहता स्मार्टफोन 13 मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स आणि 5 मेगापिक्सलची सेल्फी कॅमेरा लेन्स आहे.
  • बॅटरी : बॅटरीच्या बाबतीत डिवाइसमध्ये 3000 एमएएचची बॅटरी आणि 5 वॉट चार्जिंगला सपोर्ट करते.
  • OS : ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिवाइस अँड्रॉइड 12 वर चालतो.
  • अन्य : अन्य फीचर्स पाहता डिवाइसमध्ये 3.5 एमएम हेडफोन जॅक, ब्लूटूथ, वायफाय, एफएम रेडियो सारखे फीचर्स मिळत आहेत.
  • सुरक्षा : सुरक्षेसाठी डिवाइसला P52 रेटिंग देण्यात आली आहे. ही रेटिंग डस्ट आणि स्प्लॅश प्रूफ आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here