4,380mAh बॅटरी सह Nokia चा नवीन मिड-रेंज फोन दिसला FCC वर, येईल लवकरच बाजारात

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे कि HMD Global आपल्या नवीन फोन वर काम करत आहे. अलीकडेच बातमी समोर आली होती कि कंपनी बाजारात आपला स्वस्त स्मार्टफोन Nokia 2.4 घेऊन येणार आहे. जो कमी किंमतीसह अनेक खास फीचर्स सह येईल. काही दिवसांपूर्वी स्मार्टफोन बेंचमार्किंग साइट Geekbench वर दिसला होता. आता समोर आलेल्या माहिती नंतर समजत आहे कि कंपनी अजून एका स्मार्टफोन वर काम करत आहे जो मॉडेल नंबर TA-1277 सह FCC सर्टिफिकेशन साइट वर दिसला आहे.

91mobiles ने FCC वर Nokia TA-1274 स्मार्टफोन स्पॉट केला आहे. लिस्टिंग मध्ये फोनची जास्त माहिती समोर आलेली नाही. पण बॅटरी क्षमतेची माहिती देण्यात आली आहे. लिस्टिंगनुसार नोकिया टीए-1277 मॉडेल नंबर असलेल्या फोन मध्ये 4,380mAh बॅटरी असेल. येत्या काळात या फोन बाबत अजून माहिती समोर येऊ शकते.

गेल्या महिन्यात कंपनीने भारतात आपला Nokia 5310 लॉन्च केला होता. Nokia 5310 फोन 2.4 इंचाच्या क्यूवीजीए डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या खाली न्यूमरिक कीपॅड आहे. या फोनचे डायमेंशन 123.7mm x 52.4mm x 13.1mm आहे तसेच फोनचे वजन 88.2ग्राम आहे. फोन मधील डुअल फ्रंट स्पीकर याची खासियत आहे. नोकिया 5310 नोकिया सीरीज 30प्लस ऑपरेटिंग सिस्टम वर सादर केला गेला आहे जो एमटी6260ए प्रोसेसर वर चालतो. या फोन मध्ये 8 एमबी रॅम देण्यात आला आहे.

नोकिया 5310 मोबाइल 16एमपी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जो माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 32 जीबी पर्यंत वाढवता येतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह वीजीए कॅमेरा देण्यात आला आहे. Nokia 5310 मध्ये एमपी3 प्लेयर सोबत 3जी2, 3जीपी आणि एएमआर फाइल्स पण प्ले करू शकतो. हा फोन एफएम रेडियोला सपोर्ट करतो जो हेडफोन सोबतच वायरलेस पद्धतीने वापरता येतो.

Nokia 5310 मध्ये ब्लूटूथ 3.0 सोबत 3.5एमएम ऑडियो जॅक आणि माइक्रो यूएसबी पोर्ट देण्यात आला आहे. हा एक डुअल सिम फोन आहे जो GSM 900/1800 नेटवर्क बॅंड वर कनेक्टिविटी देतो. कंपनीने या फोन मध्ये 1200एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी कंपनीच्या दाव्यानुसार 20.7 तास टॉकटाईम आणि 22 दिवस स्टॅन्ड बाय राहू शकते. खास बाब अशी आहे कि या फोनची बॅटरीचे कवर काढून फोन मधून काढता येते.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here