Home बातम्या Nothing Phone (2) मध्ये मिळणार Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट; क्वॉलकॉमच्या अधिकाऱ्यांनी चुकून दिली माहिती

Nothing Phone (2) मध्ये मिळणार Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट; क्वॉलकॉमच्या अधिकाऱ्यांनी चुकून दिली माहिती

Highlights
  • क्वॉलकॉमच्या एका अधिकाऱ्याने चुकून Nothing Phone (2) मधील प्रोसेसरची माहिती पोस्ट केली आहे.
  • Nothing Phone (2) याच वर्षी बाजारात येणार आहे.
  • Nothing Phone (2) मध्ये फ्लॅगशिप अनुभव दिला जाईल.

टेक्नॉलॉजीच्या विश्वात लिक्स आणि रुमर्स सतत येत असतात. परंतु जेव्हा एखादी मोठी कंपनी चुकून आगामी प्रोडक्टचे स्पेसिफिकेशन शेयर करते तेव्हा त्या कंपनीची डोकेदुखी वाढू शकते. असाच एक MWC 2023 दरम्यान क्वॉलकॉमच्या मोबाइल, कॉम्प्युट आणि एक्सआर बिजनेसचे एसव्हीपी आणि जीएम Alex Katouzian यांच्याकडून आहे. त्यांनी एका लिंक्डइन पोस्टमधून नथिंग टीमचे अभिनंदन करताना Nothing Phone (2) स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8+ Gen 1 मिळणार असल्याचं सांगितलं आणि संपूर्ण टेक विश्वाच्या नजरेतून ही चूक सुटली नाही.

Alex Katouzian यांनी आपल्या पोस्टमध्ये नथिंग फोन 2 मधील प्रोसेसरचा सहज उल्लेख केला होता. परंतु त्यामुळे नथिंगच्या चाहत्यांचा उत्साह वाढला. क्वॉलकॉमच्या अधिकाऱ्यांनी काही वेळानं ही पोस्ट हटवली खरी परंतु तोपर्यंत या पोस्टचे स्क्रिनशॉट वायरल झाले होते. हे देखील वाचा: Moto G73 5G ची किंमत आणि स्पेसिफिकेशन लाँचपूर्वीच लीक; जाणून घ्या माहिती

Nothing Phone (2) हा कंपनीचा आगामी स्मार्टफोन आहे जो लवकरच बाजारात येईल. आणि कंपनीला मिळालेलं नथिंग फोन 1 च्या यशाची पुनरावृत्ती करेल. कंपनीनं सांगितलं आहे की नथिंग फोन 1 चे आतापर्यंत 6,50,000 युनिट्स विकले गेले आहेत, पहिलाच स्मार्टफोन लाँच करण्याऱ्या कंपनीसाठी हे खूप जबरदस्त आकडे आहेत.

या सुखद अपघाताव्यतिरिक्त सध्या नथिंग फोन 2 बद्दल इतर कोणतीही माहिती उपलब्ध नाही. नथिंगचे सीईओ कार्ल पेई यांनी सांगितलं होतं की आगामी स्मार्टफोन अधिक प्रीमियम असेल. त्यामुळे नव्या स्मार्टफोनच्या बिल्ड क्वॉलिटी, ग्लिफ इंटरफेस आणि हार्डवेयरमध्ये सुधारणा अपेक्षित आहेत. यातील चिपसेट तर Snapdragon 778G+ वरून Snapdragon 8+ Gen 1 नक्कीच अपग्रेड होत आहे. या बदलांमुळे स्मार्टफोनची किंमत नक्कीच वाढेल, यात शंकाच नाही.

Nothing Phone (1) स्पेसिफिकेशन्स

Nothing Phone (1) स्मार्टफोनमध्ये 6.55-इंचाचा 10-bit OLED पॅनल देण्यात आला आहे, जो 120Hz अडॅप्टिव रिफ्रेश रेट, 2400×1080 पिक्सल रेजलूशन, HDR10+, 402PPI, आणि 1200 निट्स पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. Nothing Phone (1) स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 778G+ प्रोसेसरची ताकद मिळते. सोबतीला Adreno 642L GPU देण्यात आला आहे. या फोनमध्ये 12GB पर्यंतचा LPDDR5 RAM आणि 256GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे. हे देखील वाचा: Redmi 12C आणि Redmi Note 12 4G होऊ शकतात भारतात दाखल; लीकमधून समजली माहिती

Nothing Phone (1) स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन (OIS) आणि इलेक्ट्रिक इमेज स्टेबलाइजेशन (EIS) ला सपोर्ट करतो. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP Sony IMX766 सेन्सर आणि सेकंडरी कॅमेरा 50MP Samsung JN1 अल्ट्रा वाईड सेन्सर आहे. तसेच फोनच्या फ्रंटला 16MP Sony IMX471 सेन्सर देण्यात आला आहे. फोनमधील 4,500mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात आली आहे. तसेच फोन 15W Qi वायरलेस चार्जिंग आणि 5W रिवर्स चार्जिंगला देखील सपोर्ट करतो.