Moto G73 5G ची किंमत आणि स्पेसिफिकेशन लाँचपूर्वीच लीक; जाणून घ्या माहिती

Highlights

  • Moto G73 5G स्मार्टफोन भारतात 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच केला जाऊ शकतो.
  • भारतात फोन 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह लाँच केला जाऊ शकतो.
  • Moto G73 5G मध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी + आयपीएस एलसीडी डिस्प्ले असण्याची शक्यता आहे.

Motorola भारतीय बाजारात एक नवीन स्मार्टफोन Moto G73 5G लाँच करण्याची तयारी करत आहे. विशेष म्हणजे हा कंपनीचा नवीन मिड-रेंज डिवाइस याआधीच युरोपात लाँच झाला आहे. मोटोरोलानं सांगितलं आहे की मोटो जी73 5जी भारतात 10 मार्चला लाँच होईल. हा फोन फ्लिपकार्टच्या माध्यमातून विकला जाईल. आता अधिकृत लाँचपूर्वी Moto G73 5G च्या किंमतची माहिती टिपस्टर योगेश ब्रारनं लीक केली आहे. त्याचबरोबर रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंटचा देखील खुलासा करण्यात आला आहे.

Moto G73 5G ची संभाव्य किंमत

Motorola Moto G73 5G लवकरच भारतात लाँच होईल. टिपस्टर योगेश ब्रारनुसार Moto G73 5G स्मार्टफोन भारतात 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच केला जाईल. तर टिपस्टर GadgetsData च्या लीकनुसार या फोनची किंमत 16,999 ते 17,999 रुपये दरम्यान असू शकते. परंतु Moto G73 5G च्या अधिकृत किंमतीसाठी आपल्या 10 मार्चची वाट पाहावी लागेल. हे देखील वाचा: Samsung चे दोन 5G Phone याच महिन्यात येणार भारतात; Galaxy A54 आणि Galaxy A34 च्या लाँचची माहिती लीक

युरोपमधील Moto G73 5G चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.5″ FHD+ 120Hz Display
  • 8GB RAM + 256GB storage
  • MediaTek Dimensity 930
  • 16MP Selfie Camera
  • 50MP Dual Rear Camera
  • 30W 5,000mAh battery

मोटो जी73 5जी फोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह लाँच झाला आहे जो 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन स्क्रीन पंच-होल स्टाईलसह आला ज्यात एलसीडी पॅनलचा वापर करण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 405पीपीआय सारख्या फीचर्सना सपोर्ट करतो. या फोनचे डायमेंशन 161.42 x 73.84 x 8.29एमएम आणि वजन 181ग्राम आहे.

Moto G73 5G फोन अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या मीडियाटेक डिमेनसिटी 930 ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये आयएमजी बीएक्सएम-8-256 जीपीयू आहे. हा फोन 8जीबी रॅमसह 256जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1टीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी मोटो जी73 5जी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 21 मार्चला लाँच होऊ शकतो iQOO Z7, लीकमधून समोर आली माहिती

Motorola Moto G73 5G फोनमध्ये 12 5जी बँडचा सपोर्ट देण्यात आले आहेत तसेच या मोबाइलमध्ये 4जी नेटवर्क देखील वापरता येतं. एनएफसी, 3.5एमएम जॅक आणि डॉल्बी अ‍ॅटमॉस सारखे शानदार फीचर्स यात आहेत. सिक्योरिटीसाठी स्मार्टफोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा मोटोरोला फोन 30वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here