Home बातम्या 16GB RAM आणि 100W फास्ट चार्जिंगसह OnePlus 11 चीनमध्ये लाँच

16GB RAM आणि 100W फास्ट चार्जिंगसह OnePlus 11 चीनमध्ये लाँच

वनप्लसनं नव्या वर्षात पदार्पण करताच एक दणकट स्मार्टफोन सादर केला आहे. गेले कित्येक महिने चर्चेत रोहिल्यांनंतर आता OnePlus 11 स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. सध्या हा पावरफुल मोबाइल फोन चायना मध्ये ऑफिशियल झाला आहे जो 7 फेब्रुवारीला भारतीयांच्या भेटीला येणार असल्याची माहिती कंपनीनं आधीच दिली आहे. कंपनीच्या नव्या फ्लॅगशिप OnePlus 11 मध्ये Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर आणि 16GB RAM सोबतच 100W SuperVOOC फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे.

OnePlus 11 Price

वनप्लस 11 5जी चीनमध्ये तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. फोन के बेस व्हेरिएंटमध्ये जहां 12जीबी रॅमसह 256जीबी स्टोरेज देण्यात आली आहे, ज्याची किंमत CNY 3,999 (जवळपास 47,900 रुपये) आहे. तर अन्य दोन व्हेरिएंट्स 16जीबीचा पावरफुल रॅम मिळतो. यातील 256जीबी मेमरी मॉडेलची किंमत CNY 4,399 (जवळपास 52,900 रुपये) ठेवण्यात आली आहे. तर 512जीबी मेमरी असलेला सर्वात मोठा मॉडेल CNY 4899 (जवळपास 58,900 रुपये) मध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीची झोप उडणार; 7,499 रुपयांमध्ये जबरदस्त Samsung Galaxy F04 लाँच

OnePlus 11 Specifications

वनप्लस 11 5जी 3216 x 1440 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या क्यूएचडी+ 2के डिस्प्लेसह लाँच झाला आहे. ही स्क्रीन ई5 अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालते. हा कर्व्ड एज डिस्प्ले आहे जो दोन्ही बाजुंनी बॅक पॅनलकडे वळला आहे. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो जो कोर्निंग गोरिल्ला ग्लासनं प्रोटेक्टेड आहे.

OnePlus 11 5G फोन अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो कलरओएस 13 सह चालतो. या मोबाइल फोनमध्ये 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 3.2गीगाहर्ट्जच्या फास्ट क्लॉक स्पीडवर चालतो. हा वनप्लस मोबाइल LPDDR5X RAM आणि UFS4.0 storage टेक्नॉलॉजीवर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये एड्रेनो 740 जीपीयू आहे.

फोटोग्राफीसाठी वनप्लस 11 5जी फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर 50MP Sony IMX890 प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 48MP Sony IMX581 अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 32MP Sony IMX709 2X पोर्टरेट लेन्ससह मिलकर चालतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: मायबोली मराठीत वापरा GPay, PhonePe, Amazon Pay आणि Paytm; अशी आहे भाषा बदल्याण्याची प्रोसेस

पावर बॅकअपसाठी वनप्लस 11 5जी फोन 5,000एमएएच बॅटरीसह बाजारात आला आहे. या मोठ्या बॅटरीसह स्मार्टफोन पटकन चार्ज करण्यासाठी यात 100वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे जी काही मिनिटांत बॅटरी फुल चार्ज करू शकते.