7,499 रुपयांमध्ये Samsung Galaxy F04 झाला भारतात लाँच; पाहा माहिती

Samsung Galaxy F04 स्मार्टफोन 7,499 रुपयांमध्ये भारतात लाँच झाला आहे. विशेष म्हणजे या किंमतीची माहिती 91मोबाइल्सनं गेल्याच आठवड्यात आपल्या एक्सक्लूसिव्ह रिपोर्टमध्ये दिली होती. गॅलेक्सी एफ04 सोबतच सॅमसंगनं लो बजेट सेग्मेंटमध्ये आपला नवीन डाव टाकला आहे जो थेट चीनी कंपन्यांना आव्हान देईल. या बजेट सेग्मेंटमध्ये Realme आणि Redmi सह Infinix तसेच Tecno ला सॅमसंग गॅलेक्सी एफ04 कडून टक्कर मिळेल.

Samsung Galaxy F04 Price

सॅमसंग गॅलेक्सी एफ04 स्मार्टफोन भारतात 7,499 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. शॉपिंग साइट फ्लिपकार्टच्या प्लॅटफॉर्मवरून हा मोबाइल फोन ऑफिशियल करण्यात आला आहे. या फोनमध्ये 4जीबी रॅम आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. Samsung Galaxy F04 ची सेल 12 जानेवारीपासून फ्लिपकार्टवर सुरु होईल तसेच हा Jade Purple आणि Opal Green कलरमध्ये विकत घेता येईल. सुरवातीच्या ऑफर्सनंतर या फोनची सेलिंग प्राइस 9,499 रुपये होईल. हे देखील वाचा: मायबोली मराठीत वापरा GPay, PhonePe, Amazon Pay आणि Paytm; अशी आहे भाषा बदल्याण्याची प्रोसेस

Samsung Galaxy F04 Specifications

  • 6.5″ HD+ डिस्प्ले
  • 4GB RAM
  • 13MP रियर कॅमेरा
  • MediaTek Helio P35 चिपसेट
  • 15W 5,000mAh Battery

सॅमसंग गॅलेक्सी एफ04 मध्ये 1560 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीनं याला इनफिनिटी ‘वी’ असं नाव दिलं आहे जो एलसीडी पॅनलवर बनला आहे. हा सॅमसंग फोन 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर मीडियाटेक हीलियो पी35 चिपसेटवर चालतो. ग्राफिक्ससाठी फोनमध्ये पावरवीआर जीई8320 जीपीयू आहे.

Samsung Galaxy F04 अँड्रॉइड 12 वर आधारित वनयुआयवर चालतो. हा स्मार्टफोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो ज्यात 4जी एलटीई वापरता येतं. या सॅमसंग फोनमध्ये 3.5एमएम जॅकसह अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देखील देण्यात आले आहेत. पावर बॅकअपसाठी हा मोबाइल फोन 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: Bank Mitra Apply Online: दहावी पास देखील बँक मित्र बनून करू शकतात कमाई; जाणून घ्या प्रोसेस

फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी एफ04 ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे, जोडीला एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देखील आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा मोबाइल फोन एफ/2.2 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here