OnePlus 12R किंमत आणि स्पेसिफिकेशन्स, 23 जानेवारीच्या लाँच पूर्वी जाणून घ्या सर्व लीक डिटेल्स

OnePlus 12 आणि OnePlus 12R स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार आहे. हे दोन्ही मोबाइल जबरदस्त स्पेसिफिकेशन्ससह असणार जे फ्लॅगशिप सेग्मेंटमध्ये एंट्री घेणार आहेत. यातील वनप्लस 12 पहिलाच चीनमध्ये उपलब्ध झाला आहे, याच्या डिटेल्स पहिल्याच आहेत. या सीरीजचे वनप्लस 12 आर स्मार्टफोनमध्ये काय खास मिळू शकते, याची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

OnePlus 12R भारतातील लाँच डिटेल्स

वनप्लस कंपनी येत्या 23 जानेवारी 2024 ला एक मोठ्या ग्लोबल कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. या कार्यक्रमाच्या मंचवरुन OnePlus 12 आणि OnePlus 12R भारतीय बाजारात आणले जाणार आहेत. हा वनप्लस लाँच कार्यक्रम 23 जानेवारी संध्याकाळी 7 वाजून 30 मिनटांनी सुरु होईल. ज्या ब्रँड वेबसाइटसह वनप्लसच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पण लाइव्ह दाखवले जाऊ शकते.

OnePlus 12R स्पे​सिफिकेशन्स (लीक)

  • स्क्रीन: वनप्लस 12 आर स्मार्टफोनला 1240 x 2772 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.74 इंच की फुलएचडी+ डिस्प्लेवर लाँच केले जाऊ शकते. लीकनुसार ही ओएलईडी पॅनल असणारी स्क्रिन असणार आहे. जी 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटवर रन करेल. यामध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर पण मिळू शकतो.
  • प्रोसेसिंग : OnePlus 12R ला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 ऑक्टाकोर प्रोसेसरसह बाजारात आणले जाऊ शकते. तसेच ग्राफिक्ससाठी यात फोन एड्रेनो 740 जीपीयू पाहायला मिळू शकतो.
  • रॅम स्टोरेज : वनप्लस आपल्या नवीन मोबाइल फोनला एकापेक्षा ​अधिक व्हेरिएंट्समध्ये लाँच करणार आहे. याच्या बेस मॉडेलमध्ये 8 जीबी रॅम दिली जाऊ शकते तसेच सर्वात मोठा व्हेरिएंट 16 जीबी रॅमवर लाँच केला जाऊ शकतो.
  • ओएस: समोर आलेल्या रिपोर्ट्स व लीक्सनुसार वनप्लस 12आर स्मार्टफोन सर्वात नवीन ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉइड 14 वर लाँच होईल तसेच ऑक्सीजन ओएस 14 मिळून काम करेल. फोन 2 वर्षाच्या अपडेट सह लाँच होऊ शकतो.
  • बॅक कॅमेरा: फोनला ट्रिपल रिअर कॅमेरावर लाँच केले जाऊ शकते. याच्या बॅक पॅनलवर ओआयएस टेक्नॉलॉजी असलेला 50 मेगापिक्सल मेन सेन्सर, 32 मेगापिक्सल टेलीफोटो लेन्स आणि 8 मेगापिक्सल अल्टा वाइड सेन्सर पाहायला मिळू शकते.
  • फ्रंट कॅमेरा: सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी OnePlus 12R स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाणार असल्याचे लीक्समध्ये समोर आले आहे.
  • बॅटरी: वनप्लस आपला हा स्मार्टफोन पावर बॅकअपसाठी 5,500 एमएएच बॅटरीसह कर बाजारात आणू शकते.
  • चार्जिंग : मोठ्या बॅटरीला फास्ट चार्ज करण्यासाठी यात 100 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी तसेच 50 वॉट वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजीसह रिवर्स चार्जिंग पण दिली जाऊ शकते.

OnePlus 12R किंमत (लीक)

वनप्लस 12आर एक फ्लॅगशिप फोन असेल. लीक्सच्या माहितीनुसार या फोनची प्रारंभिक किंमत 35 हजाराच्या बजेटमध्ये ठेवली जाऊ शकते. तसेच सर्वात मोठ्या OnePlus 12R रॅम मॉडेलची किंमत 40,000 रुपयांपेक्षा काही अधिक पाहायला मिळू शकते. परतुं फोनची किंमत तसेच स्पेसिफिकेशन्ससाठी अजून 23 जानेवारीपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here