12 जीबी रॅम सह OnePlus 8T वेबसाइट वर झाला लिस्ट, 14 ऑक्टोबरला होईल भारतात लॉन्च

OnePlus ने सांगितले आहे कि कंपनी ऑक्टोबरच्या 14 तारखेला आपला नवीन स्मार्टफोन OnePlus 8T टेक मंचा वर सादर करणार आहे. यादिवशी फोनचा ग्लोबल लॉन्च होईल ज्या अंतर्गत 14 ऑक्टोबरलाचा हा फोन भारतीय बाजारात पण अनाउंस केला जाईल. वनप्लस 8टी च्या लॉन्च डेट व्यतिरिक्त सध्या कंपनीने स्पेसिफिकेशन्सची कोणतीही माहिती दिली नाही. पण वनप्लसचा हा आगामी स्मार्टफोन बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट झाला आहे, ज्यामुळे लॉन्चच्या आधीच फोनची महत्वाची माहिती समोर आली आहे.

OnePlus 8T गीकबेंच वर OnePlus KB2000 मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. इथे फोनच्या नावाचा खुलासा तर झाला नाही पण बोलले जात आहे कि हा वनप्लस 8टी स्मार्टफोन आहे. गीकबेंचची हि लिस्टिंग कालची म्हणजे 29 सप्टेंबरची आहे जिथे फोनची महत्वाची माहिती समोर आली आहे. गीकबेंच वर वनप्लसचा हा स्मार्टफोन 12 जीबी पावरफुल रॅम सह लिस्ट केला गेला आहे.

गीकबेंच वर वनप्लस 8टी स्मार्टफोन मध्ये अँड्रॉइड 10 ओएस सह 1.80गीगाहर्ट्ज बेस क्लॉक स्पीड असलेला आक्टाकोर प्रोसेसर असल्याचे समजले आहे सोबतच मदरबोर्ड सेग्मेंट मध्ये ‘kona’ लिहिण्यात आले आहे. हे क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेटचे कोडनेम आहे. बेंचमार्क स्कोर पाहता या फोनला सिंगल-कोर मध्ये 3843 स्कोर तसेच मल्टी-कोर मध्ये 11714 स्कोर देण्यात आला आहे.

लॉन्च डिटेल

OnePlus 8T 5G चा लॉन्च ईवेंट 14 ऑक्टोबर संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल, जो कंपनी द्वारे सर्व अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर लाईव दाखवला जाईल. शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर पण वनप्लस 8टी चे प्रोडक्ट पेज बनवण्यात आले आहे ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि भारतात या फोनची विक्री अमेझॉन वरच होईल. फोनची विक्री कधी सुरु होईल या माहितीसाठी लॉन्चची वाट बघावी लागेल.

अशी असू शकते किंमत

OnePlus 8T बद्दल सांगण्यात आले आहे कि हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल. फोनचा पहिला वेरिएंट 8 जीबी रॅम सह 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करेल तसेच दुसऱ्या वेरिएंट मध्ये 12 जीबी रॅम सह 256 जीबी इंटरनल स्टोरेज असल्याचे सांगण्यात आले आहे. लीकनुसार वनप्लस 8टी चा 8 जीबी रॅम वेरिएंट 799 यूरो आणि 12 जीबी रॅम वेरिएंट 899 यूरो मध्ये लॉन्च केला जाईल. हि किंमत भारतीय करंसी अनुसार 69,000 आणि 77,000 रुपयांच्या आसपास आहे. आशा आहे कि भारतात या फोनची किंमत यूरोपच्या तुलनेत काहीशी कमी असेल.

असे असतील स्पेसिफिकेशन्स

वनप्लस 8टी चे संभावित स्पेसिफिकेशन्स पाहता आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार फोन मध्ये 6.55 इंचाच्या डिस्प्ले सह फुल-एचडी+ रिजॉल्यूशन आणि 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट असेल. हा फोन स्नॅपड्रॅगॉन 865+ प्रोसेसर सह येईल, त्या सोबतच दोन कॉन्फिग्रेशन दिले जातील. यातील एक 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज आणि दुसऱ्या मध्ये 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज सहा येईल. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित OxygenOS 11 सह येऊ शकतो.

लीकनुसार फोन मध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा असेल, त्याचबरोबर 16 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड लेंस आणि 5 मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर दिला जाईल. सोबत एक 2 मेगापिक्सलचा पोट्रेट सेंसर पण या कॅमेरा सेटअपचा भाग असेल. सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी वनप्लस 8टी फोन मध्ये 32 मेगापिक्सल कॅमेरा दिला जाईल, जो होल-पंच कटआउट सह स्क्रीनच्या वरच्या बाजूला असेल. तसेच बोलले जात आहे कि फोन मध्ये 4,500 एमएएच च्या बॅटरी सह 65 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाईल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here