6,000mAh बॅटरी, 48MP कॅमेरा आणि सुपर एमोलेड डिस्प्ले सह लॉन्च झाला Samsung Galaxy M30s, किंमत फक्त 13,999 रुपये

Samsung ने आज आपल्या M सीरीज मध्ये Galaxy M30s लॉन्च केला आहे. विशेष म्हणजे हा फोन Galaxy M30 चा अपग्रेडेड वर्जन आहे. तसेच कंपनीने Galaxy M30 चा 3 जीबी रॅम व 32 जीबी स्टोरेज वेरिएंट पण सादर केला आहे. चाल बघूया Samsung ब्रँड मध्ये सादर केल्या गेलेल्या या नवीन स्मार्टफोन्सची माहिती.

किंमत

किंमतीबद्दल बोलायचे तर कंपनीने Galaxy M30s चा 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज वेरीएंट 13,999 रुपये आणि 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 16,999 रुपये ठेवली आहे. तसेच हँडसेट ई-कॉमर्स साइट अमेझॉन इंडिया सोबतच कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइट वर 29 सप्टेंबर पासून सेल केला जाईल. फोन Opal Black, Sapphire Blue आणि Pearl White मध्ये उपलब्ध होईल.

हे देखील वाचा: Realme 5 ला टक्कर देण्यासाठी आला Samsung Galaxy M10s, किंमत करेल हैराण

Samsung Galaxy M30s चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy M30s चे स्पेसिफिकेशन्स पाहता फोन इनफिनिटी यू-डिस्प्ले सह सादर केला गेला आहे. या फोन मध्ये 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.4-इंचाचा फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचबरोबर प्रोसेसिंग साठी Galaxy M30s मध्ये ऑक्टा कोर 2.3 गीहार्ट्ज + 1.7 गीगाहर्ट्ज सह कंपनीचा एक्सनॉस 9611 चिपसेट देण्यात आला आहे. फोन दोन रॅम व स्टोरेज वेरिएंट 4+64 जीबी आणि 6+128 जीबी मध्ये सादर झाला आहे.

Samsung Galaxy M30s ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बॅक पॅनल वर एफ/2.0 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमारी सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा फोन एफ/2.2 अपर्चर वाल्या 5-मेगापिक्सलच्या सेकेंडरी आणि एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8-मेगापिक्सलच्या तिसऱ्या सेंसर सह येतो. सेल्फी साठी Galaxy M30s मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

हे देखील वाचा: 13 मेगापिक्सल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Honor Play 3e, जाणून घ्या किंमत

पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 6,000एमएएच ची दमदार बॅटरी मिळेल जी 15वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. फोन मध्ये यूएसबी टाईप-सी पोर्ट दिला जाईल जो बॅटरी वेगाने चार्ज करण्यास मदत करेल. तसेच फोन एंडरॉयड 9 पाई वर आधारित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here