Home बातम्या OPPO A58 5G चे स्पेसिफिकेशन्स झाले लीक; जाणून घ्या माहिती

OPPO A58 5G चे स्पेसिफिकेशन्स झाले लीक; जाणून घ्या माहिती

ओप्पो कंपनी‘ए’ सीरीजच्या नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे जो OPPO A98 नावानं लाँच होईल, अशी बातमी कालच समोर आली होती. ओप्पो ए98 स्मार्टफोनमध्ये 108MP Camera आणि 67W Fast charging देण्यात येईल, असं सांगण्यात आलं आहे. तर आता या सीरीजच्या अजून एका ओप्पो मोबाइल OPPO A58 5G ची माहिती देखील समोर आली आहे. 91मोबाइल्सला ओप्पो ए58 5जी फोनच्या फोटो, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे, जी तुम्ही पुढे वाचू शकता.

OPPO A58 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

ओप्पो ए58 5जी फोन 6.56 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाईल. ही स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली असेल तसेच 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल. OPPO A58 5G स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस असतील ज्यात खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट दिला जाईल. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला ‘वी’ शेप नॉच मिळेल. हे देखील वाचा: Battlegrounds Mobile India Download: लेटेस्ट BGMI APK फाईल डाउनलोड करा, लवकरच बॅन होणार रद्द!

OPPO A58 5G Phone अँड्रॉइड 12 आधारित कलरओएस 12.1 वर चालेल. वहीं प्रोसेसिंगसाठी या ओप्पो मोबाइलमध्ये मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेट दिला जाईल. ओप्पो ए58 5जी फोन 8 जीबी पर्यंतच्या रॅम तसेच 256 जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोेरेजला सपोर्ट करेल जो LPDDR4x RAM आणि UFS 2.2 Storage टेक्नॉलॉजीवर चालेल.

फोटोग्राफीसाठी OPPO A58 5G च्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा सॅमसंग सेन्सर आणि 108 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स मिळू शकते, तसेच फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. पावर बॅकअपसाठी या ओप्पो मोबाइलमध्ये 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 3,880एमएएच बॅटरी दिली जाईल. हे देखील वाचा: स्वदेशी इलेक्ट्रिक स्कूटर्सना टक्कर देण्यासाठी येतेय तैवानची बॅटरी असलेली स्कूटी; जाणून घ्या किंमत आणि रेंज

OPPO A58 5G ची संभाव्य किंमत

ओप्पो ए58 5जी फोन तीन व्हेरिएंटमध्ये लाँच केला जाईल. बेस व्हेरिएंट 6 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करेल तसेच दुसऱ्या व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. तसेच सर्वात मोठा OPPO A58 5G 8GB RAM + 256GB storage सह मार्केटमध्ये लाँच होईल. OPPO A58 5G Price अजूनतरी समोर आली नाही परंतु हा स्मार्टफोन Tranquil Sea Blue, Breeze Purple आणि Starry Sky Black कलरमध्ये विकत घेता येईल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.