Battlegrounds Mobile India Download: लेटेस्ट BGMI APK फाईल डाउनलोड करा, लवकरच बॅन होणार रद्द!

Battlegrounds Mobile India Download: ऑनलाइन मोबाइल गेम BGMI वरील बंदी लवकरच हटवली जाऊ शकते, त्यामुळे तुम्ही लेटेस्ट BGMI APK फाईल डाउनलोड करू शकता. भारत सरकारनं देश आणि नागरिकांच्या डेटा सिक्योरिटीचं कारण देत जुलै 2022 मध्ये BGMI वर बंदी घातली होती. तेव्हापासून हा गेम Google Play Store आणि Apple App Store वर उपलब्ध नाही. प्लेयर्स हा गेम फोनमध्ये थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मवरून डाउनलोड करू शकतात. इथे आम्ही तुम्हाला लेटेस्ट BGMI Apk फाईल डाउनलोड करण्याची आणि इंस्टॉल करण्याची सोपी पद्धत तुम्हाला सांगत आहोत. आम्ही तुम्हाला Battlegrounds Mobile India संबंधित लेटेस्ट माहिती देत आहोत.

Battlegrounds Mobile India Download: download BGMI Latest APK file

इथे आम्ही तुम्हाला बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया (BGMI) की लेटेस्ट अँड्रॉइड APK फाईल डाउनलोड करण्याची प्रत्येक स्टेप सांगत आहोत.

स्टेप 1: BGMI गेमची लेटेस्ट APK फाईल थर्ड पार्टी वेबसाइट Apkpure वरून डाउनलोड करता येईल. ही वेबसाइट ओपन करण्यासाठी इथे क्लिक करा.

स्टेप 2: उपरोक्त लिंकवरून तुम्ही BGMI ची लेटेस्ट APK फाईल डाउनलोड करू शकता. इथे तुम्हाला ‘See Available Downloads’ ऑप्शन दिसतील. इथे क्लिक करून तुम्ही फाईल डाउनलोड करू शकता.

स्टेप 3: BGMI Apk फाईल डाउनलोड झाल्यानंतर ती ओपन करा आणि इसंटॉल करा. यासाठी तुम्हाला तुमच्या अँड्रॉइड फोनवर अनोन सोर्स इनेबल करावं लागेल.

नोट: थर्ड पार्टी वेबसाइटवरून अ‍ॅप डाउनलोड करणं तुमच्या डिवाइससाठी धोकादायक ठरू शकतं. शक्य असल्यास थर्ड पार्टी सोर्सवरून अ‍ॅप डाउनलोड करणं टाळावं. हे आर्टिकल फक्त माहिती देण्यासाठी लिहिण्यात आलं आहे. भारत सरकारनं हा गेम भारतात बॅन केला आहे. त्यामुळे हा न डाउनलोड करणं उत्तम. नेहमी अ‍ॅप Google Play Store किंवा ऑफिशियल वेबसाइटवरूनच डाउनलोड करा. हे देखील वाचा: 4 कॅमेऱ्यांसह आला भन्नाट स्मार्टफोन; 6GB रॅमसह 5000mAh ची दमदार बॅटरी

BGMI वरील बंदी लवकरच हटू शकते

BGMI वरील बंदी लवकरच रद्द केली जाऊ शकते, अशी बातमी आली आहे. काही दिवसांपूर्वी क्राफ्टननं आपल्या ऑफिशियल वेबसाइटवरील सपोर्ट पेज अपडेट केला आहे. तसेच एक नवीन युट्युब चॅनेल देखील बनवला आहे. यात BGMI प्लेयर्ससाठी आर्टिकल अपडेट करण्यात आले आहेत. तसेच अनेक रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की लवकरच BGMI वरील बंदी हटवण्यात येऊ शकते. हे देखील वाचा: स्वदेशी इलेक्ट्रिक स्कूटर्सना टक्कर देण्यासाठी येतेय तैवानची बॅटरी असलेली स्कूटी; जाणून घ्या किंमत आणि रेंज

BGMI चिनी अ‍ॅप आहे का?

BGMI गेम क्राफ्टन कंपनी डेवलप आणि पब्लिश करते, जी दक्षिण कोरियाची कंपनी आहे. क्राफ्टनमध्ये चिनी टेक आणि गेमिंग कंपनी Tencent ची 13.5 टक्के भागेदारी आहे. सुरुवातीला भारतात Tencent च PUBG Mobile ची पब्लिशर होती. PUBG Mobile वरील बॅन नंतर क्राफ्टननं भारतात BGMI लाँच केला आणि पब्लिकेशन देखील स्वतः केलं, जो पुन्हा बॅन करण्यात आला आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here