स्वदेशी इलेक्ट्रिक स्कूटर्सना टक्कर देण्यासाठी येतेय तैवानची बॅटरी असलेली स्कूटी; जाणून घ्या किंमत आणि रेंज

Gogoro Electric Scooter: भारतीय इलेक्ट्रिक व्हेईकल सेगमेंटचा विस्तार पाहून आता परदेशी कंपन्या देखील आपलं नशीब अजमावण्याचा प्रयत्न करत आहेत. आता स्वदेशी इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपन्यांच्या E-Scooter ना टक्कर देण्यासाठी लवकरच भारतात तैवानची वाहन निर्माता कंपनी Gogoro आपली Electric Scooter (New electric scooters in India) सादर करणार आहे. कंपनी लवकरच Indian market मध्ये एंट्री करू शकते. चला जाणून घेऊया की Gogoro ची कोणती इलेक्ट्रिक स्कूटर भारतात कधी आणि कोणत्या किंमतीत लाँच होईल.

Gogoro या इलेक्ट्रिक स्कूटर करेल सादर?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, Gogoro भारतीय बाजारात आपल्या जागतिक बाजारातील Electric two-wheelers Gogoro S1 आणि Gogoro Viva भारतीय बाजारात सादर करेल. तसेच ही एशियन कंपनी सार्वजनिकरित्या 3 नोव्हेंबरला आपल्या भारतातील एंट्रीची घोषणा करेल. देशात बॅटरी-स्वॅपिंग नेटवर्क स्थापित करण्यासाठी गोगोरोनं आधीच भारतातील हीरो मोटरकॉर्पसह भागेदारी केली आहे. हे देखील वाचा: 4 कॅमेऱ्यांसह आला भन्नाट स्मार्टफोन; 6GB रॅमसह 5000mAh ची दमदार बॅटरी

Gogoro electric scooters in India

भारतात सर्वप्रथम Gogoro S1 electric scooter सादर केली जाऊ शकते जी premium electric scooter सेगमेंटमध्ये एंट्री करेल, अशी चर्चा आहे. कंपनी Gogoro Viva electric two-wheeler सादर करून B2B पार्टनर्सना एक डिलिव्हरी व्हेईकलचा पर्याय देईल. विशेष म्हणजे Gogoro S1 इलेक्ट्रिक स्कूटर आधीपासून तैवानमध्ये उपलब्ध आहे.

त्यामुळे हिचे फीचर्स, रेंज आणि स्पेसिफिकेशन्स तैवान सारखेच असतील. यात 7.2kW ची मोटर मिळते जी व्हीलवर 27Nm चा पीक टॉर्क देते. तसेच ही पावरट्रेन फक्त 3.7 सेकंदात S1 ला 0 वरून 50 किमी ताशी वेग गाठते. S1 एकदा चार्ज केल्यावर 150 किमीची रेंज देते. हे देखील वाचा: 5G च्या गर्दीत 4G स्मार्टफोन! 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह Realme 10 4G ‘या’ दिवशी होणार लाँच

S1 अनेक उच्च-स्तरीय इंजीनियरिंग टेक्नॉलॉजीचा वापर करते ज्यामुळे ही भारतातील एक महाग ई-स्कूटर बनू शकते. लाँच होणारी गोगोरो S1 भारतातील ओला S1 आणि S1 प्रो, बजाज चेतक, एथर 450X, बाउंस इन्फिनिटी E1 ला टक्कर देईल. या स्कूटरच्या भारतीय किंमतीची माहिती मात्र अजूनही समोर आली नाही.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here