या फीचर्स सह 13 एप्रिलला लॉन्च होईल OPPO Ace2

चिनी स्मार्टफोन कंपनी ओप्पोचे वीपी Brian Shen यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते कि कंपनी OPPO Reno Ace फोनचा अपग्रेडेड वेरिएंट एप्रिल मध्ये सादर करेल. आता OPPO VP OPPO Ace2 ची लॉन्च डेट प्रसिद्ध केली आहे. OPPO Ace2 13 एप्रिलला लॉन्च केला जाईल. यावरून स्पष्ट झाले आहे कि हा फोन रेनो सीरीज मध्ये येणार नाही कंपनी हा OPPO Ace2 नावाने सादर करेल.

माइक्रोब्लॉगिंग साइट Weibo वर Shen च्या पोस्टने सांगितले आहे कि आगामी Ace प्रोडक्ट OPPO Ace2 नावाने सादर केला जाईल. Ace एक नवीन गेमिंग स्मार्टफोन सीरीज असू शकते जी गेमिंगच्या चाहत्यांचा विचार करून सादर केली जाईल असे बोलले जात आहे.

काही रिपोर्ट्स म्हणतात कि ओप्पो Ace सीरीजच्या जोरावर वीवोच्या iQOO लाइनअपला टक्कर देण्याची प्लँनिंग करत आहे. अलीकडेच एस 2 च्या लॉन्चच्या आधीच फोनच्या लुक आणि डिजाईनचा खुलासा झाला होता.

स्पेसिफिकेशन्स

PDHM00 OPPO फोन अलीकडेच टेना आणि 3C ऑथोरिटी कडून सर्टिफिकेशन मिळाले होते. हा मॉडेल नंबर OPPO Ace2 फोनचा असेल. माहितीनुसार फोन मध्ये 6.5-इंचाचा AMOLED स्क्रीन असेल जो फुलएचडी+ रिजोल्यूशन सह येईल. तसेच स्क्रीनचा आस्पेक्ट रेश्यो 20:9 असेल. फोन मध्ये पंच होल 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असेल.

Reno Ace 2 मध्ये 5G सपोर्ट दिला जाईल. लीक नुसार हा फोन 12 जीबी रॅम सह लॉन्च केला जाईल तसेच फोन मध्ये 256 जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. बोलले जात आहे कि हा फोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट वर लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच पावर बॅकअपसाठी ओपो रेनो ऐस 2 मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते जी 65 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. फोनच्या ठोस माहितीसाठी वाट बघावी लागेल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here