Home बातम्या दिवाळीच्या आधी OPPO F21 Pro भारतात होईल लॉन्च, OPPO F17 Pro पेक्षा असेल स्लिक

दिवाळीच्या आधी OPPO F21 Pro भारतात होईल लॉन्च, OPPO F17 Pro पेक्षा असेल स्लिक

OPPO ने काही दिवसांपूर्वी आपल्या ‘F’ सीरीज मध्ये दोन नवीन फोन Oppo F17Oppo F17 Pro सादर केले होते. आता रिपोर्ट समोर येत आहे कि कंपनी आपल्या ‘एफ’ सीरीज मध्ये नवीन फोन F21 Pro लॉन्च करण्याची योजना बनवत आहे. असा रिपोर्ट टेक वेबसाइट MySmartPrice द्वारे समोर आला आहे. रिपोर्ट मध्ये माहिती देण्यात आली आहे कि OPPO F21 Pro भारतात दिवाळीच्या आधी सादर केला जाऊ शकतो जो OPPO F17 Pro पेक्षा पण स्लिक असेल. फोनच्या ऑफिशियल लॉन्चची माहिती अजूनतरी समोर आली नाही. पण कंपनी एफ19 लॉन्च न करताच थेट F21 सादर करण्याची योजना बनवत आहे, हि विचार करायला लावणारी बाब आहे.

OPPO F21 Pro च्या नावाव्यतिरिक्त फोन बाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. MySmartPrice ला हि माहिती इंडस्ट्री सोर्स कडून मिळाली आहे. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि OPPO F21 Pro च्या मागे ग्लास फिनिश असेल. OPPO F17 Pro बद्दल बोलायचे तर फोन साल 2020 चा सर्वात स्‍लीक फोन आहे जो फक्त 7.8mm जाड आहे आणि याचे वजन मात्र 164 ग्राम आहे.

Oppo F17 Pro चे स्पेसिफिकेशन्स

OPPO F17 Pro कंपनीने 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.43 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डुअल पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला आहे. एफ17 प्रो ची स्क्रीन 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट आणि 60हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते जी शानदार विजुअल क्वॉलिटी देते. या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.7 टक्के आहे.

हे देखील वाचा: 5,000एमएएच बॅटरी आणि 8 जीबी रॅम सह OPPO A32 झाला लॉन्च

OPPO F17 Pro डुअल सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या फ्रंट पॅनल वरील पंच होल मध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे सोबत तेवढाच अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर पण आहे. ओपो फोनचा सेल्फी कॅमेरा आर्टिफिशियल इंटेलिजेंस फीचर सह येतो, जो आब्जेक्ट रंगीत ठेऊन बॅकग्रांउड ब्लॅक अँड व्हाईट करू शकतो.

OPPO F17 Pro क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या सेटअप मध्ये एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. ज्या सोबत एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेस, एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलची मोनो लेंस आणि तेवढाच अपर्चर असलेली 2एमपी मोनो लेंस देण्यात आली आहे.

हे देखील वाचा: खास फीचर्स सह आला ColorOS 11, बदलतील Oppo चे स्मार्टफोन्स

ओपो एफ17 प्रो अँड्रॉइड 10 वर सादर केला गेला आहे जो कलरओएस 7.2 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा हीलियो पी95 चिपसेट देण्यात आला आहे. भारतात ओपो एफ17 प्रो 8 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी की इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. ओपो एफ17 प्रो कंपनीने 4,015एमएएच पावर असलेल्या मोठ्या बॅटरी सह बाजारात आणला आहे. हा स्मार्टफोन 30वॉट VOOC फ्लॅश चार्ज 4.0 टेक्नोलॉजी सह येतो जी कंपनीच्या दाव्यानुसार 53 मिनिटांत फोन फुल चार्ज करू शकते.