OPPO ने आज अंर्तराष्ट्रीय मार्केट मध्ये आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत अजून एक स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने हा डिवाईस ‘ए सीरीज’ मध्ये आणला आहे जो OPPO A32 नावाने मार्केट मध्ये आला आहे. हा फोन ओपोच्या होम मार्केट म्हणजे चीन मध्ये लॉन्च झाला आहे जो गेल्या महिन्यात भारतात लॉन्च झालेल्या OPPO A53 स्मार्टफोनचा ही रि-ब्रँडेड वर्जन आहे. पंच-होल डिस्प्ले आणि मोठी बॅटरी असलेल्या या स्मार्टफोनची किंमत इंडियन करंसीनुसार जवळपास 12,900 रुपयांपासून सुरु होत आहे.
OPPO A32
ओपो ए32 कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. या ओपो फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते. ओपो ए53 एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे जो कलरओएस 7.2 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टा-कोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 460 चिपसेट देण्यात आला आहे.
हे देखील वाचा: 8 जीबी रॅम आणि 6 कॅमेऱ्यांसह लॉन्च झाला स्टाईलिश आणि पावरफुल फोन OPPO F17 Pro
फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर OPPO A32 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर फोन मध्ये आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी ओपो ए53 एफ/2.0 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
OPPO A32 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक व अन्य बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी ओपो ए53 मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
हे देखील वाचा: 17,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला OPPO F17, यात आहे 8 जीबी रॅम, क्वॉड कॅमेरा आणि 30वॉट सह मोठी बॅटरी
वेरिएंट व किंमत
OPPO A32 चीन मध्ये पण दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो आणि याची किंमत CNY 1,199 म्हणजे जवळपास 12,990 रुपये आहे. त्याचप्रमाणे फोनच्या मोठ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम मेमरी सह 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे आणि याची किंमत CNY 1,499 म्हणजे जवळपास 16,100 रुपये आहे. चीन मध्ये ओपो ए32 Black, green आणि Blue कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.
ओपो ए53 2020 वीडियो